माजी उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा

५० हजार घरात पोहचला बुंदीचा प्रसाद तर भली मोठी काढली प्रभू श्रीरामांची रांगोळी

जळगाव । प्रतिनिधी

जळगाव शहराचे माजी उपमहापौर डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांचा वाढदिवस दि.२३ रोजी शहरात अनेक ठिकाणी सामाजिक कार्यातून साजरा करण्यात आला. यावेळी अनेक ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात झाला. यावेळी शहरातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.

यामध्ये जळगाव रेल्वे स्टेशन गोरगरिबांना जेवण तर जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांना फळे व जेवण, रिमांड होममधील बालकांना पोटभरून जेवण, यासोबत लीलाई आश्रममधील बालकांना जेवण तर शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील अंध मुलांच्या शाळेत जेवणाचा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी भाजपा जळगाव लोकसभा क्षेत्र प्रमुख डॉ.राधेश्याम चौधरी, भाजपा सहकार आघाडी जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष निलेश झोपे, भाजपा अनुसूचित जाती जमाती प्रदेश उपाध्यक्ष लताताई बाविस्कर, भाजपा अल्पसंख्यांक युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अशपाक खाटीक, भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष राहुल मिस्त्री, राजेश जाधव, तुषार कुलकर्णी, सुरेंद्र पाटील, शैलेन्द्र सोनवणे, मनोज चव्हाण, आसिफ अली, भाजपा युवा मोर्चा सोशल मीडिया प्रमुख भूषण मनोहर जाधव, आकाश पारदे, राधेबाबा, जहागीर खान, आकाश पारधे यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

जळगावात केले भल्या मोठ्या रांगोळीचे आयोजन

प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठेनिमित्त जळगाव शहरात माजी उपमहापौर डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांच्या माध्यमातून मु.जे.महाविद्यालय परिसरात भली मोठी प्रभू श्रीरामांची रांगोळी देखील साकारण्यात आली होती. या रांगोळीमध्ये अयोध्या येथील श्रीरामाचे मंदिर, प्रभू श्रीराम, व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चित्र देखील रेखाटण्यात आले होते. हि रांगोळी पाहण्यासाठी ४ दिवस शहरातील हजारो नागरिकांनी एकच गर्दी केली होती.

५० हजार घरात पोहचविली बुंदीचा प्रसाद

अयोध्या येथे प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी माजी उपमहापौर डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांच्या माध्यमातून शहरातील ५० हजार घरात बुंदीचा प्रसाद पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वाटप केला आहे. तर या उपक्रमाचे नागरीकांमधून माजी उपमहापौर डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांचे कौतुक देखील होत आहे.

बातमी शेअर करा !
Comments (0)
Add Comment