डॉ. इंद्रदेवेश्र्वरानंद सरस्वती महाराज यांना अमेरिकन युनिव्हर्सिटीकडून डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी पदवी

जळगावकरांतर्फे आ. राजूमामा भोळे यांच्याकडून भावपूर्ण सन्मान

जळगाव | प्रतिनिधी

शहरात डॉ. इंद्रदेवेश्र्वरानंद सरस्वती महाराज यांना अमेरिकन युनिव्हर्सिटीकडून डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी पदवी मिळाल्याबद्दल आ. राजूमामा भोळे यांनी त्यांचा जळगावकरांतर्फे सन्मान केला. अध्यात्मिक क्षेत्रात डॉ. इंद्रदेव महाराज यांचे योगदान मोठे आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे भाविकांना आयुष्यात दिशा मिळते, असे प्रतिपादन आ. राजूमामा भोळे यांनी केले.

जिल्ह्यातील श्री श्री १००८ महंत महामंडलेश्वर आंतरराष्ट्रीय संत स्वामी डॉ. इंद्रदेवेश्र्वरानंद सरस्वती महाराज यांना अमेरिकन युनिव्हर्सिटीकडून डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी पदवी मिळाली आहे. ह्युमिनिटी ऑफ स्पिरीच्युअल एज्युकेशन या विषयात हि पदवी दिल्ली येथे येथे प्रदान करण्यात आली. या अनुषंगाने आज राधा राणी सेवा समिती ट्रस्टतर्फेदेखील आज त्यांचा सत्कार समारंभ पार पडला. आ. राजूमामा भोळे यांच्या हस्ते राधाकृष्णांची प्रतिमा, शाल, पुष्पगुच्छ देऊन डॉ. इंद्रदेवेश्र्वरानंद सरस्वती महाराज यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सेवा समिती ट्रस्टचे यु. के. देशमुख, अशोक पाटील, हरसिंग नाना पाटील, मुकुंद मेटकर व सर्व सेवा समिती सदस्य, त्यांचे परिवार उपस्थित होते.

बातमी शेअर करा !
Comments (0)
Add Comment