जळगाव : जिल्हा प्रशासनाने गतकाळात ‘एमपीडीए’ अंतर्गत कारवाई करून राज्यभरातील कारागृहात रवानगी केलेल्या ४३ आरोपींना मतदानाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या पातळीवरून प्रक्रिया सुरू आहे.
राज्य शासनाने राज्यातील जिल्हानिहाय या कायद्यानुसार कारवाई केलेल्या आरोपींची संख्येविषयी विचारणा केली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ४३ आरोपी राज्यभरातील कारागृहात आहेत. त्यात चाळीसगाव, भुसावळ, जळगाव यावल, एरंडोल, चोपडा व अमळनेर तालुक्यातील आरोपींची सर्वाधिक संख्या आहे. या आरोपींना मतदानाची संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी राज्य शासनाची आहे. त्यादृष्टीने शासनाने जिल्हानिहाय आकडेवारीसह आरोपींची सविस्तर माहिती मागविली आहे. प्रत्येक कारागृह प्रशासनाच्या माध्यमातून संबंधित आरोपींना मतदानाविषयी विचारणा केली जाणार आहे. त्यांनी मतदानासाठी तयारी दाखविल्यास पोस्टर पद्धतीने मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे.