आयशर ट्रकमधील तेलांचे डबे लांबवीले ; ५ जणांविरुद्ध गुन्हा

जळगाव ;- रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकमधून ४ लाख ४८ हजार ४२० रूपये किंमतीचे गोडे तेलाचे डबे चोरून नेल्याची घटना गुरूवारी ५ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास तालुक्यातील नशिराबाद गावाजवळील शिवशक्ती कार बाजार येथे घडली . याप्रकरणी अज्ञात पाच जणांविरोधात नशिराबाद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावानजीक असलेल्या शिवशक्ती कार बाजारच्या बाजूला गोडे तेलाचे डबे भरून आणलेला आयशर ट्रक क्रमांक (एमएच ३० बीडी १३४९) हा रोडच्या बाजूला बुधवारी ४ ऑक्टोबर रोजी रात्री साडेदहा वाजता पार्किंगला लावून चालक संतोष देवीदास डाबेराव (वय-४५) रा. बल्लभनगर, अकोला आणि क्लिनर अंकित रवी शिरसाळे हे झोपले होते. गुरूवारी ५ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १ वाजेच्या अज्ञात पाच चोरट्यांनी त्यांनी आयशर ट्रकमध्ये असलेला तेलाचे डबे असा एकुण ४ लाख ४८ हजार ४२० रूपये किंमतीचा मुद्देमाल दुसऱ्या ट्रकमध्ये भरला. त्यावेळी क्लिनर अंकित शिरसाळे याला जाग आल्याचे लक्षात आल्यानंतर अज्ञात पाच चोरट्यांनी चोरी केलेला मुद्देमाल दुसऱ्या ट्रकमध्ये भरून घेवून पसार झाले. त्यानंतर चालक संतोष डाबेराव यांनी नशिराबाद पोलीस स्टेशनला तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ युनूस शेख करीत आहे.

बातमी शेअर करा !
#jalgaonCrime
Comments (0)
Add Comment