उद्योजक श्रीराम पाटील यांचा भाजपात प्रवेश

जळगाव । प्रतिनिधी

रावेर येथील उद्योजक श्रीराम पाटील यांनी आज भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला . मुबई येथील भाजपा कार्यालयात हा प्रवेश सोहळा पार पडला.
गेल्या अनेक दिवसांपासून श्रीराम पाटील हे भाजपच्या वाटेवर होते. आज त्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत असंख्य कार्यकर्त्यांसह प्रवेश केला. यावेळी प्रा. गोपाळ दर्जी यांच्यासह तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा !
Comments (0)
Add Comment