जिकडे तिकडे चर्चा, प्राणप्रतिष्ठापनेची आतुरता; नेमकं आहे तरी कसं मंदिर?

अयोध्या : श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी संपूर्ण अयोध्या सज्ज आहे. 500 वर्षांच्या संघर्षानंतर आता येत्या 22 जानेवारी रोजी भगवान श्रीराम विराजमान होणार आहेत आपल्या भव्य मंदिरात. या मंदिराचं सौंदर्य आहे अक्षरश: डोळे दिपवणारं. मात्र नेमकं असं काय आहे मंदिराच्या बांधकामात जाणून घेऊया.

राजस्थानच्या बन्सी पहाडपूरमधील नक्षीदार खडकांपासून बांधण्यात आलंय राम मंदिर. हे मंदिर आहे 380 फूट लांब आणि 250 फूट रुंद, तर 161 फूट इतकी आहे मंदिराची उंची. या तीन मजली मंदिरात अतिशय आकर्षक खांबही आहेत. मंदिरात काय काय आहे विशेष, पाहूया सविस्तर.

हातात मारुतीरायाचा झेंडा, अंगात बुरखा; त्या पायी निघाल्या अयोध्येला!

  1. पारंपरिक नागर शैलीत तयार झालंय राम मंदिर.
  2. लांबी 380 फूट, रूंदी 250 फूट, उंची 161 फूट असं आहे भव्य राम मंदिर.
  3. ही वास्तू आहे तीन मजली. 20 फूट उंचीचा आहे प्रत्येक मजला. तिथं आहेत 392 खांब आणि 44 दार.
  4. मुख्य गाभाऱ्यात पाहायला मिळेल क्षीरामांचं बालरूप, तर पहिल्या मजल्यावर वसणार श्रीरामांचा दरबार.
  5. नृत्य, रंग, सभा, प्रार्थना, कीर्तन, असे मंदिरात असतील 5 मंडप.
  6. मंदिराच्या प्रत्येक खांबावर, भिंतीवर देव-देवतांच्या असतील रेखीव मूर्ती.
  7. पूर्व दिशेत असेल मंदिराचं प्रवेशद्वार. 32 पायऱ्या चढून जाता येईल आत.
  8. वृद्ध आणि दिव्यांग व्यक्तींसाठी आहे रॅम्प आणि लिफ्टची व्यवस्था.
  9. मंदिराच्या चारही दिशांना आहे भक्कम आयताकार भिंतींचं कवच. चारही दिशांच्या भिंतींची पूर्ण लांबी आहे 732 मीटर आणि रुंदी 14 फूट.
  10. या आयताकार भिंतींच्या चार कोपऱ्यात सूर्य, देवी भगवती, गणपती आणि महादेवांना समर्पित मंदिर बांधणार. उत्तरेकडे देवी अन्नपूर्णा मंदिर आणि दक्षिणेकडे असेल मारुती मंदिर.
  11. मंदिराजवळ कायम असेल पौराणिक काळातील सीताविहीर.
  12. मंदिर परिसरात महर्षी वाल्मिकी, महर्षी वशिष्ठ, महर्षी विश्वमित्र, महर्षी अगस्त्य, निषादराज, माता शबरी आणि ऋषीपत्नी देवी अहिल्या यांना समर्पित असतील मंदिर.
  13. मंदिराच्या दक्षिण पश्चिम भागात नवरत्न कुबेर टिळ्यावर असलेल्या महादेव मंदिराचा करण्यात आलाय जीर्णोद्धार. तिथंच केलीये जटायूची मूर्ती स्थापन.
  14. मंदिरात अजिबात केलेला नाही लोखंडाचा वापर. जमिनीवरही नाही काँक्रीट.
  15. मंदिराखाली आहे 14 मीटर रुंद रोलर कॉम्पेक्टेड काँक्रीट.
  16. मातीच्या नाजूकपणापासून मंदिर राहावं सुरक्षित, यासाठी 21 फूट प्लिंथ बांधलीये ग्रॅनाइडपासून.
  17. मंदिर परिसरात सीवर ट्रीटमेंट प्लांट, वॉटर ट्रीटमेंट प्लांट आणि अग्निशमनसाठी आहे स्वतंत्र पाणीव्यवस्था. शिवाय इथं आहे स्वतंत्र पॉव्हर स्टेशनही.
  18. 25 हजार क्षमता असलेलं भाविक सुविधा केंद्र (Pilgrims Facility Centre) बांधलं जातंय. तिथे भाविकांचं सामान ठेवण्यासाठी लॉकरही असेल.
  19. मंदिर परिसरात स्नानगृह, शौचालय, वॉश बेसिन, पाण्याचे नळ, इत्यादींची आहे सुविधा.
  20. मंदिराचं बांधकाम आहे पूर्णपणे भारतीय परंपरेनुसार. त्यात वापरलंय स्वदेशी तंत्रज्ञान. पर्यावरण आणि पाणी संरक्षणावर दिलाय विशेष भर. मंदिराच्या जवळपास 70 एकरात 70% भागात आहेत झाडं.
बातमी शेअर करा !
Comments (0)
Add Comment