ब्रेकिंग ; जिल्हा दूध संघाच्या कार्यकारी संचालकांना अटक !

जळगाव | प्रतिनिधी

जळगाव जिल्हा दूध संघातल्या लोणी आणि दूध पावडरच्या अपहार प्रकरणी पोलिसांनी आज पहिली अटक केली आहे. दूध संघाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज लिमये यांच्यासह चौघांना अटक केली आहे. दूध संघाच्या व्यवस्थापकीय संचालकांना अटक झाल्याने हा खडसे गटाला मोठा धक्का मानला जात आहे.

काय आहे प्रकरण?
जळगाव जिल्हा दूध संघात काही दिवसांपूर्वी संचालक मंडळ बरखास्त होऊन शिंदे फडणवीस सरकारने प्रशासक मंडळ नेमलं होतं. प्रशासक मंडळाने दूध संघात सुमारे दीड कोटी रुपयांचा लोणी आणि दूध पावडरचा अपहार झाल्याचं समोर आलं. यानंतर दूध संघ प्रशासनाने शहर पोलीस ठाण्यात अपहाराची तक्रार दाखल केली होती.

 

मनोज लिमयेंचा सहभाग तपासात स्पष्ट
या तक्रारीच्या तपासात संशयित आरोपी म्हणून व्यवस्थापकीय संचालक मनोज लिमये यांच्यासह इतरांचा सहभाग स्पष्ट झाल्याने पोलिसांनी अटकसत्र राबवलं आहे.

 

लिमयेंसह चौघांवर कारवाई
पोलिसांनी निलेश लिमयेंसह चौघांवर ही कारवाई केली आहे. या चौघांनाही अटक केल्यानंतर पोलिसांनी त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात नेले आहे.

 

खडसेंना अडचणीत आणण्यासाठी भापची खेळी?
जळगाव जिल्हा दूध संघातील अपहार प्रकरणी राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात संघर्ष वाढला आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी आणि जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षा मंदाकिनी खडसे यांच्या माध्यमातून खडसेंना अडचणीत आणण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावल्याचे बोलले जात आहे.

 

राजकीय दबावापोटी कारवाई केल्याचा खडसेंचा आरोप
पोलिसांनी चौकशी चोरीची करावी, दस्तावेज तपासणीचे काम सहकार विभाग करेल ते तपासणीचे अधिकार पोलिसांना कोणी दिले असा सवाल उपस्थित करत, पोलीस राजकीय दबावापोटी पोलीस दूध संघाचा तपास करत असल्याचा आरोप एकनाथ खडसेंनी केला होता.

 

बातमी शेअर करा !
#4 Arrested #Jalgaon Crime #Jalgaon Milk Sangh #Milk Powder #Misappropriation
Comments (0)
Add Comment