प्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसैन यांची प्रकृती गंभीर

मुंबई : तबलावादक म्हणून ख्याती असलेले झाकीर हुसैन यांना अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. झाकीर हुसैन यांची प्रकृती गंभीर असल्याचीही माहिती सध्या समोर आलेली आहे. त्यांना हृदयविकाराचा त्रस होत असून अमेरिकत सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
झाकीर हुसैन हे मागील वर्षापासून हृदयविकाराने त्रस्त होते. सुमारे 2 वर्षांपूर्वी त्यांच्या हृदयात ब्लॉकेजमुळे त्यांना स्टेंटही देण्यात आला होता. पण आता एबीपी न्यूजला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या त्यांची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. त्यामुळे झाकीर हुसैन यांच्या प्रकृतीसाठी चाहते प्रार्थना करत आहेत. त्यांच्या कुटुंबियांनी देखील तसंच आवाहन केलं आहे.

झाकीर हुसैन यांनी वयाच्या 7व्या वर्षी केली तबला शिकण्यास सुरुवात
झाकीर हुसैन हे प्रसिद्ध दिवंगत तबला संगीतकार अल्लाह राखा खान यांचा मुलगा आहे.अनेक प्रसिद्ध भारतीय आणि परदेशी चित्रपटांसाठी त्यांनी तबला वाजवला आहे. झाकीर हुसैन यांनी वयाच्या 7 व्या वर्षी तबला शिकण्यास सुरुवात केली. वयाच्या 12 व्या वर्षी देशभरात फिरताना त्यांनी परफॉर्म करण्यास सुरुवात केली.

अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित
सुमारे चार दशकांपूर्वी उस्ताद झाकीर हुसैन संपूर्ण कुटुंबासह अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथे स्थायिक झाले.झाकीर हुसैन यांना देश-विदेशातील अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

या पुरस्कारांनी झाकीर हुसैन यांचा सन्मान
त्यांना भारत सरकारने 1988 मध्ये पद्मश्री, 2002 मध्ये पद्मभूषण, 2023 मध्ये पद्मविभूषण यासारख्या सर्वोच्च पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.झाकीर हुसैन यांना 1990 मध्ये संगीत नाटक अकादमीचा सर्वोच्च संगीत पुरस्कारही मिळाला होता.

चार वेळा ग्रॅमी पुरस्काराने सन्मान
2009 मध्ये 51 व्या ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.उस्ताद झाकीर हुसैन यांना त्यांच्या कारकिर्दीत 7 वेळा ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते, त्यापैकी त्यांना हा पुरस्कार चार वेळा मिळाला होता.

बातमी शेअर करा !
Comments (0)
Add Comment