किरकोळ कारणावरून एकाच कुटुंबातील पाच जणांना बेदम मारहाण

जळगावः तालुक्यातील रामदेववाडी येथे किरकोळ कारणावरून एका कुटुंबातील ५ जणांना लाठ्याकाठ्या, लोखंडी रॉड, वीट आणि कमरेच्या पट्ट्यांनी बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना गुरुवार २७ जून रोजी सकाळी ९.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी सायंकाळी ६.३० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात १३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील रामदेववाडीी, येथे रामदास जाधव हे आपल्या पत्नी कमलाबाई जाधव, मुलगा विलास जाधव, नरेश जाधव आणि सून वैशाली जाधव यांच्यासह वास्तव्याला आहे. या दरम्यान गुरुवारी २७ जून रोजी सकाळी ९.३० वाजता किरकोळ कारणावरून रामदास जाधव यांच्यासह त्यांच्या पत्नी, त्यांची दोन्ही मुले व सून यांना गावात राहणारे नवल गणपत चव्हाण, जगदीश गणपत चव्हाण, वनिता नवल चव्हाण, चेतन नवल चव्हाण, नयन नवल चव्हाण, गौरव जगदीश चव्हाण, तुकाराम चव्हाण, दिनेश चव्हाण, कालूसिंग चव्हाण, विकास चव्हाण, नरेश चव्हाण सर्व रा. रामपूर तांडा, स्वाती समाधान राठोड आणि रेणुका नरेश जाधव दोन्ही रा. रामदेववाडी ता. जळगाव यांनी काहीही कारण नसताना लाठ्याकाठ्या, लोखंडी रॉड, वीट आणि कमरेच्या पट्ट्यांनी ५ जणांना बेदम मारहाण केली.

 

बातमी शेअर करा !
Comments (0)
Add Comment