माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांच्या वाढदिवसानिमीत्‍त पंधरवाडा आरोग्य शिबिर

जळगाव | प्रतिनिधी
शहरातील माजी खा.डॉ. उल्हास पाटील यांच्या वाढदिवसानिमीत्‍त पंतप्रधान मोदीजी यांच्या संकल्पनेतून प्रधानमंत्री जन-आरोग्य योजनांतर्गत दि २३ ते ८ मार्चपर्यंत पंधरवाडा आरोग्य शिबिर व कमलदृष्टी अभियानाचे आयोजन डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात करण्यात आले आहे.
पंतप्रधान मोदीजींनी प्रधानमंत्री जन-आरोग्य योजनांतर्गत सर्वसामान्यांना ५ लाख रूपयापर्यंतच्या उपचाराचा लाभ मिळवून दिला आहे. मोदीजींचे आभार मानत माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांच्या वाढदिवसानिमीत्‍त पंधरवाडा आरोग्य शिबिर व कमलदृष्टी अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरात डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयाचे तज्ञ डॉक्टर तपासणी करणार असून सर्व आजारांचे शस्त्रक्रिया व उपचार देखिल मोफत केले जाणार आहे. शिबिराचा लाभ मिळवण्यासाठी आयुष्यमान भारत आरोग्य कार्ड व ओरीजीनल रेशनकार्ड तसेच आधार कार्ड सोबत आणणे आवश्यक आहे. कमलदृष्टी अभियानात ६४ व्या वाढदिवसानिमीत्‍त प्रथम येणाऱ्या ६४ रूग्णांवर फेको पध्दतीने मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. अभियानासाठी नावनोंदणी करणे आवश्यक असून आशिष भिरूड ९३७३३५०००९ या क्रमांकवर संपर्क साधावा.कमलदृष्टी अभियानात वैद्यकिय आघाडी उत्‍तर महाराष्ट्र सहसंयोजक वैद्यकिय आघाडीचे नेत्ररोग तज्ञ डॉ. नि.तु पाटील तपासणी,मार्गदर्शन व शस्त्रक्रिया करणार आहे. कमलदृष्टी अभियानात सहभागी होण्यासाठी ८०५५५९५९९९ या क्रमांकवर डॉ. नि.तु. पाटील यांचेशी संपर्क करावा. तरी जास्तीत जास्त रूग्णांनी लाभ घेण्याचे आवाहन रूग्णालय प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

बातमी शेअर करा !
Comments (0)
Add Comment