जळगाव : मागील पंधरा दिवसांमध्ये खानदेशातील विविध शहरांमध्ये पार पडलेल्या विद्यापीठ स्तरावरील क्रीडा स्पर्धांमध्ये जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयाच्या विध्यार्थी खेळाडूंनी चमकदार कामगिरी करून नेत्रदीपक असे यश मिळवले. धुळे येथील निकम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पॉलिटेक्निक महाविद्यालय या ठिकाणी १४ डिसेंबर रोजी पार पडलेल्या मुलांच्या मल्लखांब स्पर्धेमध्ये जी. एच. रायसोनी महाविद्यालयाचा विद्यार्थी सागर किशोर चौधरी याने विभागीय स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवून जयपूर, राजस्थान येथे होणाऱ्या विद्यापीठस्तरीय स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे. तसेच आयएमआर महाविद्यालयात पार पडलेल्या (पुरुष गट) तलवारबाजी या क्रीडाप्रकारात जी. एच. रायसोनी महाविद्यालयाच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचा विध्यार्थी कुणाल विलास भावसार या विध्यार्थ्याची निवड झाली असून तो संभाजीनगर येथील एम.जी.एम.विद्यापीठ येथे होणाऱ्या विद्यापीठस्तरीय तलवारबाजी या क्रीडाप्रकारात कबचौउमविचे प्रतिनिधित्व करणार आहे. तसेच एमबीए विभागातील कुणाल लक्ष्मीकांत जैन हिची महिला गटात तर चिरायू ज्ञानेश्वर बागुल याची पुरुष गटात व्हॉलीबॉल या क्रीडाप्रकारात निवड झाली असून येणाऱ्या काळात मध्यप्रदेश येथील महाराजा छत्रसल बुंदेलखंड विद्यापीठ व नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथे होणाऱ्या आंतरविद्यापीठ क्रीडास्पर्धेत हे कबचौउमविचे प्रतिनिधित्व करणार आहे. त्याचबरोबर नुकतीच मुळजी जेठा महाविद्यालय येथे रायफल पिस्तोल शुटींग निवड चाचणी स्पर्धा पार पडली. या स्पर्धेमध्ये मॅकेनिकल अभियांत्रिकी विभागातील राजरत्न मिलिंदकुमार गाढे व सिव्हील अभियांत्रिकी विभागातील सत्यजित मिलिंदकुमार गाढे या खेळाडूंची निवड झाली असून हे खेळाडू कुरुक्षेत्र येथील कुरुक्षेत्र विद्यापीठ येथे २ ते ७ जानेवारी २०२४ दरम्यान होणाऱ्या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. तसेच फुटबॉल या क्रीडाप्रकारात बीसीए विभागातील पंकज नारायण पाटील व एमबीए विभागातील अर्पित किशोर वानखेडे या विद्यार्थ्यांची निवड झाली असून ३१ डिसेंबर ते २ जानेवारी दरम्यान एच.एस.एन.सी.विद्यापीठ मुंबई येथे होणाऱ्या आंतर विद्यापीठ क्रीडास्पर्धेत हे विध्यार्थी कबचौउमविचे प्रतिनिधित्व करणार आहे. तसेच भरत दिलीप चौधरी, धनश्री राजीव जाधव व करिष्मा धर्मेंद्र पाटील या विद्यार्थ्यांची देखील स्विमिंग या क्रीडाप्रकारात निवड झाली असून २ ते ४ जानेवारी दरम्यान ते तामिळनाडू येथील एस.आर.एम.विद्यापीठ कत्तनकुलथुर येथील आंतर विद्यापीठ स्विमिंग स्पर्धेत सहभागी होणार आहे. यानंतर बास्केटबॉल स्पर्धेसाठी एआयएमएल अभियांत्रिकी विभागाची धनश्री संदीपकुमार पाटील या विद्ध्यार्थीनीची निवड झाली असून, ३० डिसेंबर ते ३ जानेवारी दरम्यान ग्वोल्हेर येथील आय.टी.एम.विद्यापीठ येथील आंतर विद्यापीठ क्रीडास्पर्धेत सहभागी होणार आहे. या सर्व खेळाडूंच्या यशाबद्दल जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल व अँकड्मिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांच्या हस्ते त्यांचा गौरव करून पुढील स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी महाविद्यालयाचे सर्व विभागप्रमुख व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. तसेच निवड झालेल्या सर्व खेळाडूंना महाविद्यालयाचे क्रीडा विभागप्रमुख प्रा. जयंत जाधव व क्रीडाशिक्षक राहुल धुळणकर यांनी विशेष मार्गदर्शन केले.