महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मेळावा !

अमळनेरला ११ रोजी मुख्यमंत्र्यांची उपस्थिती, १७६०.४० कोटींच्या कामांचाही शुभारंभ

अमळनेर : मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत अमळनेरात ११ ऑक्टोबर रोजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थीचा सन्मान सोहळा तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियान अंतर्गत महिला बचत गट सदस्यांचा मेळावा आयोजित केल्याची माहिती मंत्री अनिल पाटील यांनी दिली. ११ रोजी दुपारी एक वाजता प्रताप महाविद्यालयाच्या प्रांगणात होत असलेल्या मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांची उपस्थिती असेल. मान्यवरांच्या १७६०,४० कोटीच्या विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात येईल. मेळाव्याला केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, महिला व बालविकास मंत्री अदिती ठाकरे व खासदार स्मिता वाघ यांची उपस्थिती असेल. मेळाव्यासाठी महिलांना सन्मानाने घरपोच पत्र पाठवून निमंत्रण दिले जात आहे. एकही महिला योजनेपासून वंचित राहू नये तसेच अर्ज भरताना त्यांची फिरफिर व आर्थिक लूट होऊ नये यासाठी नगरपरिषद, ग्रामपंचायत व अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून विविध ठिकाणी सुविधा केंद्र उभारले, त्यामुळे मतदासंघांत १०० टक्के अर्ज भरले जाऊन पात्र ठरलेत. तीन ते चार हफ्त्यांचे पैसे देखील मिळाल्याने आर्थिक उलाढाल वाढल्याचे अनिल पाटील म्हणाले. या लाभार्थी महिलांचा सन्मान होऊन त्यांच्याशी तसेच महिला बचत गटाच्या सदस्यांशी हितगुज व्हावे तसेच त्यांच्या इतर काही अडचणी असतील तर त्या देखील समजून घ्याव्यात यासाठीच मुख्यमंत्री व दोन्ही उपुख्यमंत्री स्वतः येत असल्याचे पाटील यांनी कळवले आहे.

मतदारसंघात विकासकामांचा धडाका
पाडळसे प्रकल्पअंतर्गत उपसा सिंचन योजना १ ते ५ मध्ये २५६५७ हेक्टर जमिन सिंचनासाठी पाईपद्वारा पाणीपुरवठा वितरण नेटवर्कचे पंप हाऊससह बांधकाम रक्कम १०१०.१९ कोटी, नगरोत्थान महाअभियान योजनेअंतर्गत शहरवासीयांना २४ तास पाणीपुरवठा योजना रक्कम १९७ कोटी. केंद्रीय मार्ग निधी प्रकल्पअंतर्गत रामा- ३९ ते जांभोरा ढेकू सारबेटे हेडावे अमळनेर, शिरसाळे, तरवाडे, वावडे, मांडळ रस्ता प्रजिमा-५१ कि.मी. ५/२०० ते २५/६०० ची सुधारणा करणे रक्कम ४७.६८ कोटी. हायब्रीड अम्युनिटी अंतर्गत आमलााड, मोड, शहादा, सांगवी, हातेड, अमळनेर, पारोळा रा.मा. क्र.१ कि.मी. १४९/५७० ते १८२/२०० ची सुधारणा करणेकामी रक्कम २०६ कोटी. वावडे, जानवे, बहादरपूर, पारोळा, कासोदा प्रजिमा-४६ कि.मी. १४/०० ते ३८/९०० ची सुधारणा करणेकामी १३० कोटी. आपत्ती सौम्यीकरण कामे, पूर प्रतिबंधक कामे, आर्च बंधारा बांधणे व पुलाचे बांधकाम करणे, दुष्काळ प्रतिबंधक कामे, सानेनगर आर्च बंधारा बांधणे व पुलाचे बांधकाम करणेकामी २५.३९ कोटी. सार्वजनिक बांधकाम विभाग अमळनेर आर्च बंधारा बांधणे एकुण कामे रक्कम ७१.१२ कोटी. सार्वजनिक बांधकाम विभाग अमळनेर पूर प्रतिबंधक संरक्षण भिंतीचे बांधकाम करणे रक्कम ६.२० कोटी. जलसंपदा विभाग जळगाव निम्न तापी विभाग अमळनेर अंतर्गत दुष्काळ प्रतिबंधक कामे एकुण रक्कम ७.८३ कोटी. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा-२ (बचें-१) संशोधन व विकास अंतर्गत १ मुंगसे ते पातोंडा ते सोनखेडी ते निमझरी रस्ता एकुण लांबी ११.०९० की.मी. रक्कम १६.४९ कोटी. हेडावे ते सुंदरपट्टी ते सडावन रस्ता एकुण लांबी ५ किमी रक्कम ६.५६ कोटी. रामा-१५ ते देवळी देवगाव ते नगाव बु. रस्ता लांबी ३.६०० किमी रक्कम ५.८३ कोटी, कंकराज ते भोकरवारी ते शेळावे बु. रस्ता एकुण लांबी ७.०८० किमी रक्कम ९.४४ कोटी. सुमठाणे ते वडगाव ते बहादरपूर ते पुनगाव ते पारोळा रस्ता एकुण लांबी १४.२१० किमी रक्कम २०.६७ कोटी, एकुण सर्व कामांची रक्कम १७६०.४० कोटी.

बातमी शेअर करा !
Comments (0)
Add Comment