जी. एच. रायसोनी अभियांत्रिकीत प्राध्यापक-पालक सभा उत्साहात

जळगाव, ;- येथील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातील प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभागात प्राध्यापक-पालक सभा उत्साहात संपन्न झाली. सदर सभेसाठी जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल या प्रमुख मार्गदर्शक म्हणून व्यासपीठावर उपस्थित होत्या.

कार्यक्रमाच्या सुरवातीला सभेचे समन्वयक व प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. जितेंद्र वडद्कर यांनी आपल्या प्रास्ताविकेत पालक सभेच्या आयोजनाचा उद्देश व हेतू स्पष्ट केला. तसेच महाविद्यालयाचा वार्षिक अहवाल सादर केला. यानंतर उपस्थित पालकांना मार्गदर्शन करतांना रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी नमूद केले कि, जी. एच. रायसोनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणासोबतच कौशल्य आधारित शिक्षण मिळावे आणि नवीन कौशल्य आधारित तांत्रिक शिक्षणाचा विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्धीसाठी उपयोग व्हावा हा मुख्य उद्देश समोर ठेवून विविध उद्योग केंद्रासोबत रायसोनी इस्टीट्युटने सामंजस्य करार केला आहे

तसेच हा मुख्य उद्देश समोर ठेवून थेरीपेक्षा प्रॅक्टिकल ज्ञानाला प्राधान्य देत विविध अॅक्टिव्हिटी देखील महाविद्यालयात राबविण्यात येतात. मुळात आजच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये विद्यार्थ्यांची प्रगती उत्तम असून तंत्रज्ञानाबाबत त्यांना बऱ्याच गोष्टी न शिकवता ते स्वतः शिकतात. हीच बाब त्यांनी अभ्यासातही केली पाहिजे. यामुळे त्यांची शैक्षणिक प्रगती होण्यास मदत होईल. पालकांनीदेखील आपल्या मुलाच्या महाविध्यालयातील अभ्यासाबाबत वेळोवेळी चौकशी केली पाहिजे. त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे तसेच त्यांनी यावेळी महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची पालकांना ओळख करून दिली. विद्यार्थ्यांच्या सोयी तसेच शैक्षणिक सुविधा व रोजगाराभिमुख शिक्षणाविषयी मार्गदर्शन केले.

पालकांनी महाविद्यालयाची शिक्षणपद्धती तसेच उपक्रमांबद्दल समाधान व्यक्त करत त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होत असल्याचे नमूद केले. पालकांनी विविध सूचना नोंदविल्या तसेच त्यांच्या अंमलबजावणीसाठी सहकार्याचे अनुमोदनही दिले. प्रा. प्रिया टेकवानी यांनी सभेचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन केले. सभेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. स्वाती बाविस्कर, प्रा. प्रियांका बर्डे, प्रा. श्रीराम अग्रवाल यांनी सहकार्य केले. सदर पालक सभेचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे अध्यक्ष . सुनील रायसोनी यांनी अभिनंदन केले .

बातमी शेअर करा !
#jalgaon
Comments (0)
Add Comment