आय. एम. आर महाविद्यालयात रंगला गरबा दांडिया

 

जळगाव;– शारदीय नवरात्र निमित्त के. सी. ई. सोसायटीचे इन्सिस्ट्युट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड रिसर्च, जळगाव मध्ये गरबा आणि दांडिया २०२३ चे आयोजन करण्यात आले. विद्यार्थांनी उत्स्फूर्तपणे साथ देवून आपल्या कलागुणांचे बहारदार सादरीकरण केले. पारंपारिक वेशभषेमध्ये युवक युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले. आय. एम. आर. च्या संचालिका डॉ. शिल्पा बेंडाळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम अतिशय देखणा व उत्साहाने ओथंबून वाहणारा ठरला. त्यांनी विद्यार्थ्यांना देवीच्या अनेक रुपांमागील इतिहास, अर्थ गर्भ, आशय समजून घ्या व डोळसपणे पूजा करा, असे सांगितले.
या कार्यक्रमाची सुरुवात सौ. हेमा अमळकर व सी. ए. पूजा मुदंडा यांच्या हस्ते आरती करुन झाली. यावेळी सौ. हेमा अमळकर म्हणाल्या, आपल्या परंपरामागे देखील तत्वज्ञान असते, ते समजून घेतले पाहिजे. तर पूजा मुंदडा यांनी विद्यार्थांना अभ्यासाबरोबर अध्यात्मिकतेची जोड देण्यास सांगितले. परीक्षक म्हणून यामिनी कुलकर्णी व करण ललवाणी यांनी काम पाहिले. यावेळी अकॅडेमिक डीन, डॉ. तनुजा फेगडे, एम.बी.ए. विभाग प्रमुख, डॉ. ममता दहाड, एम. बी. ए. समन्वयक, डॉ. पराग नारखेडे, एम. सी. ए. समन्वयक, उदय चतुर, बी.बी.ए. समन्वयक, डॉ. अनुपमा चौधरी, बी.सी.ए. समन्वयक , श्वेता फेगडे, आय. एम. सी. ए. समन्वयक, रुपाली नारखेडे, प्रा. एस. एन. खान यांच्यासह अनेक पालक व विद्यार्थी युवक-युवती उपस्थित होते. या कार्यक्रमास सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद देवून डी. जे. तालावर पारंपारिक वेशभूषेत गरबा व दांडिया यांचे सादरीकरण केले. या कार्यक्रमाचे प्रमुख संयोजन डॉ. ममता दहाड यांनी केले. व विद्यार्थ्यामध्ये भटू अग्रवाल, सेजल तरडा, वैभव चतुरभूज, खगेश कोल्हे, ख़ुशी क्रिश्नानी यांनी संयोजक म्हणून काम केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आय. एम. आर. च्या सर्व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थांबरोबरच फॅकल्टी साठी देखील दांडिया स्पर्धा घेण्यात आली.
गरबा व दांडिया स्पर्धेतील विजेते.
बेस्ट ऑउट फीट in Female – हिमानी शर्मा
बेस्ट ऑउट फीट in male – याज्ञेश पाटील
बेस्ट स्टाईल इन दांडिया Female – कल्याणी निकुंभ
बेस्ट स्टाईल इन दांडिया male – गणेश सैनी
बेस्ट स्टाईल इन गरबा Female – ख़ुशी सोनार
बेस्ट स्टाईल इन गरबा male – मयूर बडगुजर
दांडिया Queen – संजना मोरे
दांडिया king – तेजस बोरसे
गरबा Queen – कशिश दारा
गरबा king – मित जैन
तर प्राध्यापकांमधून प्रा. नेहा ललवाणी, प्रा. अश्विनी पाटील, प्रा. वर्षा पाठक यांना पारितोषिक देण्यात आले.

 

बातमी शेअर करा !
i. M. Rangala Garba Dandiya in R college
Comments (0)
Add Comment