कोळी समाजाच्या पाठीशी मी भक्कमपणे उभा ! : आ. चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

मुक्ताईनगर : प्रतिनिधी

जात प्रमाणपत्रासाठी गेल्या चार दिवसांपासून कोळी समाजबांधवांचे अन्नत्याग आंदोलन सुरू असून आज आमदार चंद्रकांत पाटील यांनी या आंदोलनास पाठींबा दर्शविला. तसेच, हा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी त्यांनी जिल्हाधिकार्‍यांसोबत बैठक घेतली. याप्रसंगी माजी मंत्री दशरथ भांडे यांचीही उपस्थिती होती. यातून हा प्रश्‍न लवकर मार्गी लागणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. आज 13 ऑक्टोबर रोजी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय येथे, ४ दिवसांपासून जळगांव जिल्ह्यातील आदिवासी कोळी समाज बांधव यांचे आदिवासी कोळी जमातीचे जातीचे दाखले तात्काळ मिळावे व वीनाअट मिळावे या साठी अन्नत्याग आंदोलन सुरु होते. यासाठी आज आदिवासी कोळी समाजाचे जेष्ठ नेते तथा माजी मंत्री श्री दशरथ जी भांडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली व श्री प्रभाकर आप्पा सोनवणे, डॉ.श्री.शांताराम दादा सोनवणे, श्री. ऍड. अरुण सोनवणे, सौ.मंदाताई सोनवणे, श्री.जितेंद्र सपकाळे , श्री.सुभाष सोनवणे, आणि समाजातील इतर मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील आदिवासी कोळी समाजाचे प्रमूख नेते यांच्या उपस्थितीत जळगांव जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात बैठक आयोजित केली होती.
बैठकीसाठी आ चंद्रकांत पाटील उपस्थित राहून समाजाचा प्रलंबित असलेली एसटी जात प्रमाणपत्र बाबत येणाऱ्या अडचणी बाबत चर्चा केली व तात्काळ विनाअट आदिवासी कोळी जमातीचे प्रमाणपत्र समाज बांधव यांना देण्यात यावे व तात्काळ प्रांत अधिकारी यांना लिखित स्वरूपात आजच आदेश पारित करावे व सेतू सुविधा केंद्र धारकांना आदिवासी कोळी जमातीचे प्रकरण तात्काळ कोणतीही अडचण न आणता स्वीकारण्यात यावे यासाठी सुद्धा आदेश द्यावे असे सुचविले. याची तात्काळ दखल घेत जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद यांनी आजच जिल्ह्यातील सर्व प्रांत-अधिकारी यांना लेखी आदेश देण्याचे आश्वासित केले. व सोमवार पासुन जे प्रलंबित प्रकरणे आहेत त्यांना तात्काळ आदिवासी कोळी जमातीचे प्रमाणपत्र देण्यात येतील असे सांगितले या वेळी आमदार श्री. राजूमामा भोळे,आदिवासी कोळी समाजाचे नेते, जेष्ठ मंडळी व समाज बांधव आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा !
#आ. चंद्रकांत पाटील
Comments (0)
Add Comment