जोरदार शक्तीप्रदर्शन करीत राजू मामा भोळे यांनी भरला उमेदवारी अर्ज

जळगाव : हे शक्तिप्रदर्शन नसून ही जनतेची साथ आहे. त्याच बळावर आम्ही जनतेची कामे करू शकलो व जनतेचे सेवक झालो अशी प्रतिक्रिया नामनिर्देशन पत्र भरल्यानंतर माध्यमांशी बोलताना आमदार राजू मामा भोळे यांनी दिली. जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत सोमवार दि. २८ उमेदवारी अर्ज भरला.

जीएम फाउंडेशन येथे महिलांनी आमदार राजू मामा भोळे यांचे औक्षण केले. त्यानंतर नामांकन रॅलीच्या सुरुवातीला शिवतीर्थ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला खासदार स्मिता वाघ, आमदार राजूमामा भोळे यांनी पुष्पहार अर्पण केल्यानंतर जी. एम. फाउंडेशन येथील भाजपा कार्यालयापासून रॅलीला सुरुवात करण्यात आली. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व आमदार गिरीश महाजन हेही रॅलीमध्ये सहभागी झाले.

रॅलीमध्ये आबालवृद्धांसह महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. रॅलीमध्ये पक्षाच्या तसेच आमदार राजूमामाच्या घोषणासह परिसर दुमदुमून गेला होता. नामांकन रॅली शिवतीर्थ चौक, नेहरू चौक, टॉवर चौक, प्रकाश मेडिकल चौक, बळीराम पेठ मार्गे वसंत स्मृती कार्यालय, भाजप येथे विसर्जित झाली. नामांकन रॅलीचे सभेमध्ये रूपांतर झाले.
यावेळी, खा. स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, माजी महापौर सिमा भोळे, माजी आ. लता सोनवणे, जिल्हाध्यक्ष जळकेकर महाराज, निलेश पाटील, अभिषेक पाटील, अनिल अडकमोल, लल्लन सपकाळे, उज्वला बेंडाळे यांच्यासह भाजपा, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

यानंतर आमदार सुरेश भोळे उर्फ राजू मामा यांनी आपले नामांकन पत्र दाखल केले. यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की गेल्या दहा वर्षात मी जनतेचे 50 टक्के कामे केलेली आहेत. 25 टक्के कामे पाईपलाईन मध्ये आहे व उरलेले 25 टक्के काम या विजयानंतर होणार आहे. जनतेला अपेक्षा असलेला 24 तास उपलब्ध असलेल्या सेवक असल्यामुळे आज जनतेने या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले आहे. या जनतेच्या आशीर्वादानेच आमचा विजय होईल.

बातमी शेअर करा !
Comments (0)
Add Comment