जगात डॉलरला आता रुपयाचे आव्हान

१८ देशांची रुपयात व्यवसाय करण्यास मान्यता

मुंबई – आंतरराष्ट्रीय व्यापारात भारतीय रुपयाची लोकप्रियता सातत्याने वाढत आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने गेल्या वर्षी जुलैमध्ये भारतीय रुपयांमध्ये सीमापार व्यापार व्यवहारांबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. तेव्हापासून जगातील 18 देश भारतासोबत रुपयांमध्ये व्यापार करण्याचा विचार करीत आहेत. भारतीय रुपयाच्या या वाढत्या लोकप्रियतेमुळे त्याला आंतरराष्ट्रीय चलनाचा दर्जा दिला जाऊ शकतो. आतापर्यंत जागतिक व्यापारात डॉलरचा मोठा वाटा आहे. जगातील बहुतेक देश एकमेकांकडून वस्तू खरेदी-विक्रीसाठी डॉलरचा वापर करतात. जगातील अनेक देशांनी आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी रुपयाचा वापर करण्यात रस घेतला आहे आणि त्याच्या सेटलमेंटची प्रक्रिया सुलभ करण्याचा प्रयत्न केला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अलीकडेच 60 विशेष व्होस्ट्रो खाती तयार करण्यास मान्यता दिली आहे. रशिया, श्रीलंका यांसारख्या देशांकडून रुपयात आंतरराष्ट्रीय व्यापार शक्य होईल. भारताचे अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी संसदेत सांगितले की, केंद्रीय रिझर्व्ह बँकेने देशांतर्गत आणि परदेशी एडींच्या स्वरूपात व्होस्ट्रो खाती उघडण्यास मान्यता दिली आहे.

यानंतर जगातील 18 देशांसोबत भारताचा व्यवसाय डॉलरऐवजी रुपयात करता येईल. आंतरराष्ट्रीय व्यापारात डॉलरच्या जागी रुपयाला चालना देण्यात रशिया आघाडीवर असल्याचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांनी सांगितले. निर्यात वाढवण्यासाठी भारताने स्थानिक चलनात व्यापाराला चालना देण्यासाठी अनेक योजना तयार केल्या आहेत. ज्या देशांनी भारतासोबत रुपयाचा व्यापार करण्यात रस घेतला आहे त्यात रशिया, सिंगापूर, श्रीलंका, बोत्सवाना, फिजी, इस्रायल, केनिया, मलेशिया, मॉरिशस, न्यूझीलंड, ओमान आणि ब्रिटन यांचा समावेश आहे. गेल्या काही वर्षात भारतीय रुपयात आंतरराष्ट्रीय व्यापार स्थिरावण्याची यंत्रणा झपाट्याने विकसित होत असून जगातील 18 देश त्यात रस घेत आहे.

बातमी शेअर करा !
#IndianRupee
Comments (0)
Add Comment