‘डाक टिकटों में महात्मा’ प्रदर्शनाचे आज गांधी उद्यानात उद्घाटन

जळगाव | प्रतिनिधी

जळगाव येथील महात्मा गांधी उद्यानात मंगळवार दि. 11 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 10.00 वाजता जागतिक टपाल दिनाच्या औचित्याने गांधी रिसर्च फाऊंडेशन व जळगाव टपाल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘डाक टिकटों में महात्मा’ या आकर्षक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलेले आहे.   अशोक जैन व मान्यवरांच्याहस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात येत आहे.

स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष सध्या साजरे होत आहे. या काळातच जागतिक टपाल दिनानिमित्त गांधी रिसर्च फाउंडेशन व जळगाव टपाल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित, ‘डाक टिकटों में महात्मा’ हे माहितीपूर्ण, रंजक प्रदर्शन भरविण्यात येत आहे. या कार्यक्रमास बी. व्ही.चव्हाण (अधीक्षक, टपाल विभाग, जळगाव),  जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडचे चेअरमन तथा गांधी रिसर्च फाउंडेशनचे संचालक अशोक जैन, निसर्गराजा कृषी विज्ञान केंद्र, तांदलवाडीचे शशांक पाटील यांची विशेष उपस्थिती असणार आहे.

 

‘डाक टिकटों में महात्मा’

 

महात्मा गांधी हे जगातील सर्वात लोकप्रिय राजकारणी आणि व्यक्तीमत्वांपैकी एक गणले गेलेले आहेत. गांधी रिसर्च फाउंडेशन व जळगाव डाक विभागाच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधीजींच्या टपाल तिकिटांचे जनसामान्यांसाठी प्रदर्शन आयोजित केले आहे. बहुतेक देशांनी महात्मा गांधीजींच्या सन्मानार्थ टपाल तिकिटे जारी केली आहेत. देश-विदेशातील तिकिटे पाहिली तर गांधीजींचे संपूर्ण जीवन चरित्र पहायला मिळते. टपाल तिकिटांच्या जगात गांधीजी हे सर्वात जास्त दिसणारे भारतीय आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. भारतातील सर्वाधिक टपाल तिकिटांवर गांधीजींची छबीच बघायला मिळते. टपाल तिकिटांच्या माध्यमातून गांधीजींचे जीवन दर्शन रसिकांना बघायला मिळणार आहे. जगातील जितक्या देशांनी टपाल तिकिटे काढली आहेत त्या 120 हून अधिक देशांची तिकिटे गांधी रिसर्च फाउंडेशनच्या अभिलेखागारात उपलब्ध आहेत. गांधी रिसर्च फाउंडेशनचा सध्या राष्ट्रपिता महात्मा गांधी जन्मजयंती पंधरवडा सुरू आहे. त्यामध्ये अनेक कार्यक्रम सुरू आहेत. टपालाच्या तिकिट संग्रह करणाऱ्यांसाठी, टपाल तिकीट गोळा करणाऱ्या छंद असणाऱ्यांसाठी हे प्रदर्शन उपयुक्त ठरणार आहे.

बातमी शेअर करा !
Comments (0)
Add Comment