‘बोलवा विठ्ठल’ मध्ये पांडुरंगाची प्रचिती

जळगाव | प्रतिनिधी
ओंकार प्रधान, विठ्ठल नामाची शाळा भरली, चल ग सखे पंढरीला या भक्ती गितांसह अनुभूती इंग्लीश मिडीअम स्कूलच्या चिमुकल्यांनी दिंडी, पालखी, रामकृष्ण हरीचा गजर करीत अवघी पंढरी उभी केली आणि पांडुरंगाची प्रचिती जळगावकर रसिकांना करून दिली.
स्व.वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान व भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन यांच्या संयुक्तपणे आयोजित ‘बोलावा विठ्ठल’ या भक्ती मैफिल कांताई सभागृह येथे पार पडली. दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात झाली. याप्रसंगी अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलच्या प्राचार्या रश्मी लाहोटी, चांदोरकर प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा दीपिका चांदोरकर, ज्येष्ठ रंगकर्मी शरद पांडे, जळगाव चे उत्तम वेणूवादक रमेश बणकर उपस्थिती होती.
त्यांच्यासह भवरलाल ॲण्ड कांताबाई फाऊंडेशनच्या वतीने अनिल जोशी, ज्येष्ठ रंगकर्मी पियूष रावळ, प्रा. राजेंद्र देशमूख, रविंद्र धर्माधिकारी यांच्यासह अनुभूती स्कूलचे शिक्षवृंद उपस्थित होते.
आषाढी एकादशी निमित्त माऊलीच्या भेटीला चिमुकल्यांच्या स्वरांची हाक आली. आणि गजर, पालखी, रिंगण सोहळ्यात थाळ-मृदंग साथीने वातावरण भक्तीमय झाले. अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून सादरीकरणाने लक्ष वेधून घेतले.

भक्ति अभंगाने विठू नामाचा गजर
बोलावा विठ्ठल मध्ये ओंकार प्रधान, विठ्ठल नामाची शाळा भरली,देव माझा विठू सावळा, विठू माउली तू, चल ग सखे पंढरीला, रखुमाई रखुमाई,विठ्ठलाच्या पायी वीट, विष्णुमय जग, ज्ञानियांचे ज्ञेय, निजरूप दाखवा हो, पांडुरंग नामी लागलासी, हरिभजना वीण, काळ देहासी आला, काया ही पंढरी, मालकौंस अभंगमाला अशी एकाहून एक भक्ति अभंगांनी रसिक श्रोत्यांना चिंब केले. स्पर्श मोहिते, प्राप्ती गुगले, वीरा महाकाळ, देवश्रृती अंबुलकर, भाविका पाटील, साची पाटील, दिव्येश बाघमार, दक्ष ठक्कर, भावेश पाटील, रेहांश चांडक या अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अंकित कुमार, अम्रितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली गितांचे सादरीकरण केले. यावेळी तबल्यावर प्रसन्न भुरे, हार्मानियमवर शौनक दीक्षित, मंजीरीची साथ शुभम कुलकर्णी यांनी साथ संगत दिली. सिद्धेश भावसार, निरजा वाणी, स्वरा जगताप, विवेक चव्हण, अथर्व मुंडले, मानसी असोदेकर यांनी यशस्वीतेसाठी सहकार्य केले. दीपिका चांदोरकर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. गुरूवंदना वरूण नेवे यांनी सादर केली. प्रास्तविक व आभार दिपक चांदोकर यांनी केले. जान्हवी पाटील हिने उत्कृष्ट निरूपण केले.

बातमी शेअर करा !
#jainirrigationnewsjalgaon#JALGAONNEWSashokjain
Comments (0)
Add Comment