जळगाव – भगवान श्री परशुराम जन्मोत्सव २०२३ पुढील महिन्यात २२ एप्रिल रोजी बहुभाषिक ब्राह्मण संघातर्फे शहरात जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा होणार आहे. या भव्य जन्मोत्सवानिमित्ताने आयोजन होत असलेल्या विविध कार्यक्रमाची माहिती देणाऱ्या विशेष रंगीत पुरवणी अंकाच्या प्रकाशन सोहळ्यासह समाज बांधवांना देण्यात येणाऱ्या निमंत्रण पत्रिका शहरातील पाच मंदिरातील देवतांना देण्यात आल्या. प्रारंभ नवी पेठ येथील श्री इच्छापूर्ती गणेश मंदिरात बहुभाषिक ब्राह्मण संघाचे अध्यक्ष डॉ. अजित नांदेडकर, महिला अध्यक्षा सौ. मनीषा दायमा यांच्या हस्ते निमंत्रण पत्रिका पूजन करून यशस्वीतेसाठी श्री गणेशाला अर्पण करण्यात आल्या.
चिमुकले राम मंदिरात श्री परशुराम जन्मोत्सव 2023 चे आयोजन व मागील वर्षभरात राबवण्यात आलेल्या विविध सामाजिक सांस्कृतिक धार्मिक उपक्रमांची माहिती देणाऱ्या संघाच्या विशेष रंगीत पुरवणी अंकाचे प्रकाशन ह.भ.प. दादा महाराज जोशी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यासह जुने श्री राम मंदिरात ह.भ.प. मंगेश महाराज जोशी यांच्या शुभहस्ते निमंत्रण पत्रिका ग्राम देवतेस देवून कार्य सिद्धिस नेण्यासाठी आवाहन करण्यात आले. तसेच रथ चौकातील श्री लक्ष्मीनारायण मंदिरात श्री परशुराम जन्मोत्सव निमंत्रण पत्रिका लक्ष्मीनारायण,संकटमोचक हनुमान, नवग्रह महादेव मंदिरात देण्यात आली याप्रसंगी बहुभाषिक ब्राह्मण संघाचे अध्यक्ष डॉ. अजित नांदेडकर संस्थापक अध्यक्ष श्रीकांत खटोड, संजय व्यास, संजय व्यास, महिला मंडळ अध्यक्षा सौ. मनिषा दायमा, सौ. स्वाती कुलकर्णी विश्वनाथ जोशी शाम दायमा सरोजताई वाडकर, शिव शर्मा, पियुष रावळ, प्रसाद जोशी यांचे सह कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होते