जागतिक तायक्‍वांदो स्पर्धेत राजस कडूसकरला सुवर्णपदक

जळगाव – साऊथ कोरिया येथील सेऊत येथे पार पडलेल्या जागतिक तायक्‍वांदो स्पर्धेतील ब्ल्यू बेल्ट कॅटेगिरीमध्ये चमकदार कामगिरी करुन अवघ्या १२ वर्षाच्या राजस कडूसकरने (मुळ गाव जळगाव ह.मु.पुणे) सुवर्णपदक प्राप्त केले. तर पुमसे स्पर्धेतही कांस्य पदक त्याला मिळाले.

जळगाव शहरातील सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ स्व डॉ.उल्हास कडूसकर व ज्योती कडूसकर यांचा नातू व एंडोक्रोनियोलॉजिस्ट डॉ.प्रशांत व त्वचाविकार तज्ञ डॉ.सुचित्रा कडूसकर यांचा मुलगा राजस ह्याने जागतिक तायक्‍वांदो स्पर्धेत सक्रीय सहभाग नोंदवून सुवर्णपदक प्राप्त केले. साऊथ कोरियातील सेऊत या ठिकाणी शनिवार दि.१९ व रविवार दि.२० ऑगस्ट रोजी पुमसे व ब्ल्यू बेल्ट कॅटेगिरीतील स्पर्धा पार पडल्यात. यात जगातील १६ राष्ट्रांनी सहभाग नोंदविला असून भारतातून ६ टिमचा सहभाग होता. त्यात राजस कडूसकर याने उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला होता.

पुणे येथील दिल्‍ली पब्लिक स्कूल येथून तो शालेय शिक्षण घेत असून भोसले तायक्वांदो आणि फिटनेस अकादमीतून तो प्रशिक्षणही घेत आहे. खेळाची आवड त्याला लहानपणापासूच आहे. या जागतिक पातळीवरील स्पर्धेत ९ ते १२ वयोगटातून त्यांने भाग घेऊन सुवर्णपदक प्राप्त केले. त्याने प्राप्त केलेल्या यशाबद्दल गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, सचिव डॉ.वर्षा पाटील, सदस्या डॉ.केतकी पाटील, डीएम कार्डिओलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात.

राजसची कामगिरी कौतुकास्पद – डॉ.उल्हास पाटील

इतक्या लहान वयात जागतिक पातळीपर्यंतच झेप घेत राजसने आपल्या देशाचे नाव तर उंचावलेच त्यासोबतच जळगावचे नाव जागतिक पातळीवर नेले. स्व.डॉ.उल्हास कडूसकर सर व ज्योती मॅडम यांचे आशिर्वाद तसेच प्रशांत व सुचित्रा यांचे संस्कारातून घडत असलेला राजसला भावी वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा व आशिर्वाद.. १२ व्या वर्षी जागतिक पातळीवरील स्पर्धेतून सुवर्णपदक राजसला मिळाले असून त्याची कामगिरी खरोखरच कौतुकास्पद आहे.

बातमी शेअर करा !
#jalgaon
Comments (0)
Add Comment