गिरिष महाजन यांच्या प्रयत्नांनी जळगावात क्रीडा संकुल उभारणीस २४० कोटींचा निधी

जळगाव ;- तत्कालीन क्रीडामंत्री व सध्याचे ग्रामविकास मंत्री गिरिष महाजन यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे जिल्ह्यातील मेहरूण येथील ३६ एकर जागेत विभागीय क्रीडा संकुलाच्या कामांसाठी २४० कोटी रूपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. तसेच जामनेर येथे तालुका क्रीडा संकुल उभारण्यासाठी ३९ कोटी रूपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने प्रशासकीय मान्यतेचा शासन निर्णय १५ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केला आहे. सध्या नाशिक, धुळे, जळगाव व नंदुरबार या चार जिल्ह्यांकरिता नाशिक येथे विभागीय क्रीडा संकुल कार्यरत आहे. जळगाव व धुळे या दोन जिल्ह्यांसाठी जळगाव मधील मेहरूण येथील गट नंबर ३४३ मध्ये १४.६५ हेक्टर (३६ एकर) जागेत विभागीय क्रीडा संकुल उभारण्यास जागा मंजूर आहे. जळगाव विभागीय क्रीडा संकुलास २४० कोटी ५४ लाखांची प्रथम प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यामुळे या क्रीडा संकुलाच्या कामास आता गती येणार आहे.‌ जळगाव व धुळे जिल्ह्यातील खेळाडू व क्रीडाप्रेमींना या क्रीडा संकुलाचा मोठा फायदा होणार आहे. जळगाव तसेच खान्देशातील आसपासच्या जिल्ह्यातील खेळाडूंना राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचा सराव आणि मार्गदर्शन मिळणार आहे.

बातमी शेअर करा !
#jalgaongirish mahajaansports
Comments (0)
Add Comment