जामनेर पालीकेच्या अर्थसंकल्पात निवडणुकीसाठी २५ लाखाची तरतुद

जामनेर : नगरपालिकेच्या सोमवारी झालेल्या बैठकीत २०२३ – २४ या वर्षाचा अर्थसंकल्प मंजूर कारण्यात आला. यंदा मालमत्ता व इतर करात झालेल्या वाढीमुळे पालिकेस नागरिकांकडून मिळणाऱ्या विविध कराच्या माध्यमातून ३ कोटी ८८ लाख ४० हजार इतके उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष साधना महाजन होत्या.
यावर्षी पालिकेची निवडणूक होणार असल्याने यासाठी २५ लाखाची तरतूद करण्यात आली आहे. शासनाकडून विविध शीर्षकांतर्गत सुमारे २ कोटी ४३ लाख ३० हजार इतके अनुदान मिळणे अपेक्षित आहे.पालिकेला मालमत्ता व सेवांपासून सुमारे ३ कोटी १३ लाख ७१ हजार इतके उत्पन्न अपेक्षित आहे.
अर्थसंकल्पात ३७ कोटी ३३ लाख ४८ हजार एकुण नगरपरिषद निधी जमा असुन ३६ कोटी ६० लाख ९५ हजार खर्च दाखवीला आहे.
बैठकीस नगराध्यक्ष साधना महाजन, मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले, उपनगराध्यक्ष महेंद्र बाविस्कर यांचेसह नगरसेवक उपस्थित होते शशिकांत लोखंडे यांनी अर्थसंकल्पाचे वाचन केले.

बातमी शेअर करा !
Comments (0)
Add Comment