जामनेर | उपसंपादक शांताराम झाल्टे
जामनेर येथील सुतार जनजागृती सेवा संस्थेच्या वतीने व तालुका सचिव ईश्वर जंजाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त शिरसाळा मारूती देवस्थान येथे श्रीराम मंदिरास आकर्षक घड्याळ देणगी स्वरूपात देण्याचे उत्कृष्ट कार्य सस्थेमार्फत करण्यात आले असून सुतार जनजागृती सेवा संस्थेचे ता सचिव ईश्वर जंजाळकर यांचा वाढदिवस दिनांक २७ रोजी जामनेर येथे साजरा करण्यात आला.
यावेळी उपस्थित युवा जिल्हाउपाध्यक्ष श्री गोपाल जाधव, शहर अध्यक्ष किरण सोनवणे, शहर सचिव प्रसन्न चांदेकर, पत्रकार शांताराम झाल्टे,राहुल भोई ,गोपाल माळी, जितु माळी ,किरण भोई, करण साळूंके व मित्र परिवारासह वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. व सुतार जनजागृती सेवा संस्थेचे तालुका सचिव ईश्वर जंजाळकर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देण्यात आल्या.