केकतनिंभोरा : प्रतिनिधी
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या ‘मन की बात’ या विशेष कार्यक्रमात राज्यातील भाजप कार्यकर्ते सहभागी झाले आहे. यात केकतनिंभोरा गावानेही सहभागी झाले.
यावेळी येथील ग्रामपंचायतमध्ये सरपंच अमोल पाटील यांच्या मार्गदशनाखाली या कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाला उप सरपंच गणेश ब्राम्हणे, सदस्य निवृत्ती पाटील, सरला पंडित, जिजाबाई भिगारे, कोमल पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती गावकरी मनोज शिंदे, ईश्वर भोंडे, भागवत तेली, रवींद्र पंडित, रमेश भिल, श्रीराम पाटील, योगेश पाटील, सचिन पाटील यांच्यासह भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.