कुलभूषण पाटील यांनी दाखल केला अपक्ष उमेदवारी अर्ज

जळगाव : शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी शुक्रवारी शक्तीप्रदर्शन करीत जळगाव तहसील कार्यालयात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी गजानन मालपुरे, चेतन शिरसाठ, माजी नगरसेवक अमर जैन, विठ्ठल पाटील यांच्यासह समर्थक उपस्थित होते. माजी उप महापौर कुलभूषण पाटील हे शिवसेनेकडून उमेदवारीसाठी इच्छुक होते परंतु शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जळगाव शहरातून जयश्री महाजन यांना तिकीट दिल्यामुळे कुलभूषण पाटील यांनी थेट बंडाचा झेंडा हाती घेवून दि.२५ रोजी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शुक्रवारी खान्देश मील येथे दुपारी १ वाजता माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यासह समर्थक एकत्रित आले असून खान्देश सेंट्रल मॉल येथून वाजत गाजत रॅली काढण्यात आली. त्यानंतर तहसीलदार शितल राजपूत यांच्याकडे कुलभूषण पाटील यांनी दुपारी २ वाजता अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.

बातमी शेअर करा !
Comments (0)
Add Comment