मानसिक आरोग्याच्या उपचारासाठी हेल्पलाईन ; डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयाचा उपक्रम

जळगाव – जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्‍त मंगळवार दिनांक १० ऑक्टोबर रोजी डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या मानसोपचार विभागातर्फे मानसिक आरोग्य हेल्पलाईन क्रमांक सुरु करण्यात आला आहे. सर्व मानसिक समस्यांच्या निवारणासाठी ९३०७६२२६९२ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन मानसोपचार तज्ञ डॉ.विलास चव्हाण यांनी केले आहे.

ताणतणावाच्या जीवनशैलीमुळे समाजात आज मोठ्या प्रमाणात विविध प्रकारच्या मानसिक आजाराचे रुग्ण आढळतात. अशावेळीस काय करावे ? कोणाला सांगावे ? ते समजत नाही. अशाप्रकारच्या मानसिक आजाराच्या विळख्यात अडकत जात असलेल्या रुग्णांसाठी १० ऑक्टोबर रोजी डॉ.उल्हास पाटील रुग्णालयाच्या मानसोपचार विभागातर्फे हेल्पलाईन क्रमांक सुरु करण्यात आला आहे. या क्रमांकाच्या उद्घाटनाप्रसंगी गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, डीएम कार्डिओलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील, अधिष्ठाता डॉ.एन.एस.आर्विकर, वैद्यकीय अधिक्षक डॉ.प्रेमचंद पंडित, प्रशासकीय अधिकारी प्रमोद भिरुड, मानसोपचार विभागातील डॉ.विलास चव्हाण, डॉ.विकास, डॉ.आदित्य, डॉ.हुमेद, डॉ.आदित्य, डॉ.सौरभ यांच्यासह समुपदेशक बबन ठाकरे उपस्थीत होते. याप्रसंगी रांगोळी स्पर्धा देखील घेण्यात आली असून त्यातून जनजागृती करण्यात आली.

जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्‍त अधिष्ठाता डॉ.एन.एस.आर्विकर यांनी सांगितले की, रुग्णालयात मानसोपचार तज्ञांद्वारे शास्त्रशुद्धरित्या उपचार केले जातात. येथे तज्ञ डॉक्टर्स, समुपदेशक आहेत. मानसिक रुग्णांना योग्य वेळी उपचार मिळावे, त्यांच्या मनातील भिती दूर व्हावी याकरीता हेल्पलाईन क्रमांक सुरु केला असून रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहनही डॉ.आर्विकर यांनी केेले.

याप्रसंगी बोलतांना डॉ.विलास चव्हाण म्हणाले की, शारिरीक सोबतच मानसिक आरोग्यही चांगले असणे गरजेचे आहे. जागतिक आरोग्य संघटनेने यावर्षी मानसिक आरोग्य हा मुलभूत अधिकार आहे ही थीम दिली असून त्याला अनुसरुन आज डॉ.उल्हास पाटील सर यांच्या सहकार्‍याने मानसिक रुग्णांसाठी हेल्पलाईन क्रमांक आम्ही सुरु केला आहे. २४ तास ह्या क्रमांकाद्वारे आपल्याला मार्गदर्शन, समुपदेशन व योग्य दिशा दिली जाणार आहे. तरी आपण ९३०७६२२६९२ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

बातमी शेअर करा !
#jalgaonDr.Ulhas Patil Medical College and Hospital Psychiatry Department
Comments (0)
Add Comment