ना.धों.महानोर यांच्या जयंतीनिमित्त ‘हा कंठ दाटूनी आला’ स्वरांजली

जळगाव;- कविवर्य ना. धों. महानोर यांच्याशी जेव्हाही बोलणं व्हायचे तेव्हा शेती, माती, पाणी आणि साहित्य यावरच चर्चा व्हायच्या यातुनच दादांशी ऋणानुबंध वाढत गेले. सुलोचनाच्या पाऊल खुणा हे काकुंच्या आठवणीतील पुस्तक मला अर्पण केल्याची आठवण ‘हा कंठ दाटुनी आला’ या कार्यक्रमागची भुमिका जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी सांगितली. यावेळी आई कांताई यांच्यासाठी महानोर यांनी लिहलेली ‘गुंतलेला जीव मायेचा’ ही कविता व ‘आम्ही या खेड्यात जन्मलो दुःखाची गाथा’ हे गीत म्हटले.

कविवर्य ना. धों. महानोर यांच्या जयंती निमित्त छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमाची सुरूवात कविवर्य ना.धों. महानोर लिखीत शब्दांचा खेळ या गीताने झाली. याप्रसंगी मान्यवरांनी पुष्पार्पण केले. याप्रसंगी आमदार सुरेश भोळे, बाळासाहेब महानोर व कुटुंबातील सदस्य, रवींद्रभैय्या पाटील, डाॕ.सदानंद देशमुख, डॉ. सिसिलिया कार्व्हलो, श्रीकांत देशमुख, अशोक कोतवाल, अनिश शहा, नारायण बाविस्कर, डॉ. सुधीर भोंगळे, अमोल शेठ, विलास पाटील उपस्थित होते.

भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन, बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट व परिवर्तन तर्फे आयोजित ‘हा कंठ दाटुनी आला’ कार्यक्रमात ‘या नभाला या भुईला दान द्यावे’,’लेकी गेल्या दुर देशी जशा चिमण्या आकाशी’ यासह महानोरांच्या कविता जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, संदीप मेहता, श्रीकांत देशमुख, सदानंद देशमुख, सिसिलिया कार्व्हलो, डाॕ. रेखा महाजन, हर्षल पाटील, शशिकांत महानोर, पूर्णिमा हूंडीवाले, सोनाली पाटील, जयश्री पाटील, सुनीला भोलाणे, नेहा पवार कविता वाचन केले.

तर सुदिप्ता सरकार, श्रद्धा कुळकर्णी, मंजुषा भिडे, रजनी पवार, चंद्रकांत इंगळे, ऐश्वर्या परदेशी, अक्षय गजभिये यांनी ‘आज उदास उदास पांगल्या सावल्या’, ‘शब्दांचा हा खेळ मांडला’, ‘गो-या देहावरती कांती’, ‘पिक करपलं पक्षी दूर देशी गेलं’, ‘मी गातांना गीत तुला’, ‘जांभूळ पिकल्या झाडाखाली’, ‘मी रात टाकली’, ‘जगजेठी भरली तिची ओठी’, ‘भरलं आभाळ, घन ओथंबुन येती’, ‘नभ उतरू आलं’ या गीतांसह राजसा जवळ जरा बसा ही लावणी सादर केली. त्यांना साथ संगत भूषण गुरव, योगेश पाटील, रोहित बोरसे यांनी दिली.
निवेदन ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील यांनी केले. कार्यक्रमाची संकल्पना नारायण बाविस्कर यांची होती. सुत्रधार हर्षल पाटील, विनोद पाटील होते.

बातमी शेअर करा !
#ASHOK JAIN
Comments (0)
Add Comment