भांडण सोडविण्यासाठी आलेल्या दोघांना बेदम मारहाण

जळगावः तालुक्यातील आसोदा येथे शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या दोन जणांना लाकडी काठीने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना बुधवारी २५ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी गुरूवारी २६ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रकाश पुरूषोत्तम सपकाळे (वय- ४२) रा. आसोदा ता. जि. जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून

करतात. बुधवारी २५ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजता त्यांचा पुतण्या अर्जून सपकाळे आणि गावातील महेंद्र अशोक रायसोनी, अण्णा अशोक रायसोनी, सागर सपकाळे आणि अजय सपकाळे सर्व रा. आसोदा ता. जि. जळगाव यांचा जुन्या वादातून भांडण सुरू होते. त्यामुळे सुरू असलेले भांडण सोडविण्यासाठी प्रकाश सपकाळे आणि ईश्वर कोळी हे गेले. याचा राग आल्याने महेंद्र अशोक रायसोनी, आण्णा अशोक रायसोनी,

सागर सपकाळे आणि अजय सपकाळे सर्व रा. आसोदा ता. जि. जळगाव यांनी प्रकाश सपकाळे आणि ईश्वर कोळी यांना लाकडी काट्याने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली..

याप्रकरणी प्रकाश सपकाळे यांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विलास शिंदे करीत आहे

 

 

 

बातमी शेअर करा !
#jalgaonCrimemarhan
Comments (0)
Add Comment