एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये स्वच्छता अभियान

जळगाव- देशभरात 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान स्वच्छता पंधरवडा आयोजित करण्यात आला असून या उपक्रमांतर्गत १ ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने एक तारीख एक तास हा स्वच्छता उपक्रम राबविला जात आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशन परिसरात आज सकाळी आठ वाजेपासून पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी परिसर स्वच्छ केला.

यांचा होता सहभाग

या उपक्रमात पोलीस निरीक्षक जयपाल हिरे ,सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चौधरी ,पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे ,निलेश गोसावी ,रूपाली महाजन, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, राजेंद्र उगले ,पोलीस हेडकॉन्स्टेबल शिवदास नाईक, सुनील सोनार, गफार तडवी ,संजय धनगर ,रामकृष्ण पाटील, सचिन मुंडे, किरण पाटील ,योगेश बारी ,मंदार पाटील, पोलीस कॉन्स्टेबल संदीप धनगर ,पवन कुमावत, पंकज पाटील, साईनाथ मुंडे, सतीश गरजे ,तुषार गिरासे, अतुल पाटील ,छगन तायडे, किरण पाटील, राहुल रगडे ,असे स्वच्छता अभियानात उपस्थित होते.

बातमी शेअर करा !
#jalgaonsvachta abhiyan
Comments (0)
Add Comment