जळगाव : विधानसभेची निवडणूक आता काही दिवसांवर आली असून, कोणत्याही दिवशी निवडणुकीसाठी आचारसंहिता जाहीर होऊ शकते. यासाठी विद्यमान आमदारांकडून तयारी सुरू झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून निवडणुकीच्या प्रचारात सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे सर्वच आमदार आता सोशल मीडियावर चांगलेच अॅक्टिव्ह झाले आहेत. मतदारांशी सोशल मीडियाद्वारे संपर्क वाढविण्यावर आमदारांचा भर दिसून येत आहे. दरम्यान, काही आमदारांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडिया अधिक सक्षम करण्यासाठी काही कंपन्यांसह काही आयटी क्षेत्रातील युवकांवर जबाबदारी दिली आहे. मतदारांपर्यंत थेट कोणत्याही क्षणी पोहोचण्याचे माध्यम म्हणजे आहे. त्यामुळे सोशल मीडिया सोशल मीडियाचे महत्त्व लक्षात घेत राजकीय नेते व आमदार सोशल मीडियावर अॅक्टिव्ह झालेले दिसून येत आहेत.
कोणत्या आमदाराचे किती फॉलोअर्स?
गिरीश महाजन, जामनेर
- फेसबुक – १,०५,०००
- इंस्टाग्राम – ५३,०००
- ट्विटर – १,१७,५००
सुरेश भोळे, जळगाव शहर
- फेसबुक – २०,०००
- इंस्टाग्राम – १५,२००
- ट्विटर – ३,७७२
मंगेश चव्हाण, चाळीसगाव
- फेसबुक – २,५४,०००
- इंस्टाग्राम – २,२३,०००
- ट्विटर – १५,०००
किशोर पाटील, पाचोरा
- फेसबुक – ३४,०००
- इंस्टाग्राम – ३८,९००
- ट्विटर – ४४६७
गुलाबराव पाटील, जळगाव ग्रामीण
- फेसबुक – १,०२,०००
- इंस्टाग्राम – १,०६,०००
- ट्विटर – ८,१०७
अनिल पाटील, अमळनेर
- फेसबुक – १९,०००
- इंस्टाग्राम – ७,६५८
- ट्विटर – १,९८५
लता सोनवणे, चोपडा
- फेसबुक – ८,०००
- इंस्टाग्राम – २,०००
- ट्विटर – ३४१
चंद्रकांत पाटील, मुक्ताईनगर
- फेसबुक – ८४,०००
- इंस्टाग्राम – ३,७६७
- ट्विटर – ६६८
शिरीष चौधरी, रावेर
- फेसबुक – १५,०००
- इंस्टाग्राम – २,३५३
- ट्विटर – ३२०
चिमणराव पाटील, एरंडोल
- फेसबुक – ५,६००
- इंस्टाग्राम – १,४२४
- ट्विटर – १०२६
संजय सावकारे, भुसावळ
- फेसबुक – ८,२००
- इंस्टाग्राम – २,६१६
- ट्विटर – ११८