मनसे उमेदवार डॉ.अनुज पाटील यांनी साधला व्यापाऱ्यांशी संवाद

जळगांव : शहरातील जुने बी.जे मार्केट व नवीन बी.जे मार्केटमधील व्यापाऱ्यांशी उमेदवार डॉ.अनुज पाटील यांनी प्रचारादरम्यान संवाद साधला. व्यापाऱ्यांच्या समस्या, अडचणी आणि त्यांच्या विकासासाठी आवश्यक उपायांवर चर्चा केली. डॉ. पाटील यांनी व्यापारी वर्गाचे हित लक्षात घेऊन त्यांचे मुद्दे मनापासून ऐकले आणि त्यांच्या व्यवसाय वृद्धी व सोयीसुविधांसाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांबाबत आपल्या योजना मांडल्या.

स्थानिक व्यवसायाच्या प्रगतीसाठी मनसेचे ध्येय आणि धोरणे स्पष्ट केली. त्यांनी व्यापाऱ्यांना दिलासा देत आश्वासन दिले की, निवडून आल्यास ते व्यवसायासाठी अनुकूल वातावरण निर्माण करतील, मार्केटमधील पायाभूत सुविधा सुधारतील, तसेच व्यापाऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याचे प्रयत्न करतील. त्यांचा उद्देश जळगाव शहरातील व्यावसायिक वातावरण अधिक मजबूत आणि सुविधा-संपन्न बनवणे आहे. या चर्चेमुळे व्यापाऱ्यांमध्ये सकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या असून, डॉ. पाटील यांच्या नेतृत्वाखाली व्यवसाय व विकासासाठी समर्थन मिळेल, असा विश्वास व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.

मी निवडून आल्यास व्यवसायासाठी अनुकूल वातावरण निर्माण करेल, मार्केटमधील पायाभूत सुविधा सुधारेल तसेच व्यापाऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याचे सतत प्रयत्न करीत राहील.
– उमेदवार डॉ.अनुज पाटील

 

 

सुरक्षा कारणास्तव शस्त्रधारी पोलीस संरक्षण
मनसेचे उमेदवार डॉ. अनुज पाटील यांना जिल्हा पोलीस प्रशासनाने सुरक्षा कारणास्तव शस्त्रधारी पोलीस संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. सुरक्षेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे प्रचारादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडून येऊ नये, यासाठी खबरदारी घेणे हा आहे. जिल्हा पोलीस प्रशासनाने डॉ. अनुज पाटील यांच्या सुरक्षिततेसाठी अतिरिक्त सुरक्षा उपाययोजना राबविल्या असून, शस्त्रधारी पोलीस कर्मचारी त्यांच्यासोबत असतील आणि प्रचारादरम्यान त्यांची सतत देखरेख करतील. पोलिस प्रशासनाच्या या निर्णयामुळे प्रचारादरम्यान अनुचित घटना टाळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे यांनी जिल्हा पोलीस प्रशासनाच्या या निर्णयाचे आभार मानले आहेत.

पत्नी डॉ. लीना पाटील प्रचारात सक्रिय
डॉ. लीना पाटील यांनी निवडणूक प्रचारात सक्रिय सहभाग घेतला आहे. डॉ.लीना पाटील या डॉ.अनुज पाटील यांच्या सुविद्य पत्नी आहेत. डॉ. अनुज पाटील हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) उमेदवार आहेत. ते निवडणुकीच्या तयारीत असून मतदारांशी संवाद साधत आहेत. त्यांच्या प्रचारात डॉ. लीना पाटील सक्रिय भूमिका निभावत आहेत आणि मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांतून प्रयत्नशील आहेत. डॉ. लीना पाटील यांची मतदारांशी विशेष नाळ जोडण्याची पद्धत आणि प्रभावी संवादामुळे प्रचारात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे. त्या सामाजिक माध्यमांवरूनही प्रचार करत असून मतदारांना त्यांच्या पतीच्या योजनांविषयी आणि उद्दिष्टांविषयी माहिती देत आहेत. त्यांच्या मेहनतीमुळे मतदारांत उत्साह दिसत असून, निवडणुकीत त्यांच्या कार्याला चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे.
मनसेचे उमेदवार असलेले डॉ. अनुज पाटील यांच्या प्रचारासाठी डॉ. लीना पाटीलचे योगदान महत्त्वपूर्ण ठरत आहे, आणि हे दोघेही मनापासून जनतेच्या सेवेसाठी झटत आहेत. दरम्यान डॉ. के डी पाटील हे डॉ.अनुज पाटील यांचे वडील असून ते ही शहरातील विविध भागात महत्त्वाच्या भेटीगाठी घेत आहेत व संवाद साधत आहे. महेंद्र पाटील(संगणक तज्ञ पुणे) हे डॉ.अनुज पाटील यांचे शालक असून पूर्णवेळ सुट्टी टाकून प्रचारामध्ये सक्रिय आहेत.

बातमी शेअर करा !
Comments (0)
Add Comment