MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांची भरती !

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)  अंतर्गत  उद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, कर सहाय्यक, लिपिक-टंकलेखक पदांच्या एकूण 228 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2022 आहे. (www.edivyasarthi.com)

  • परीक्षेचे नाव – महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022
  • पदाचे नाव – उद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, कर सहाय्यक, लिपिक-टंकलेखक
  • पद संख्या – 228 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
  • अर्ज शुल्क –
    • अमागास  – रु. 394/-
    • मागासवर्गीय- रु.294/-
    • माजी सैनिक – रु.44/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 01 ऑगस्ट 2022
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 ऑगस्ट 2022
  • अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in
  • READ PDF
  • APPLY HERE
     
    पदाचे नाव  शैक्षणिक पात्रता
    उद्योग निरीक्षक, गट-क उद्योग निरीक्षक, गट-क संवर्ग वगळता इतर संवर्गासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता.उद्योग निरीक्षक, गट-क संवर्गाकरीता शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे राहील :सांविधिक विदयापीठाची, अभियांत्रिकी मधील (स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका, किंवाविज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी.पदविका/पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेस बसलेले उमेदवार पूर्व परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र असतील.मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
    कर सहाय्यक मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण
    लिपिक- टंकलेखक. मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट या अहंतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण
    1. अर्ज https://mpsconline.gov.in संकेतस्थळावर सादर करावे.
    2. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना आयोगाच्या https://mpsconline.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
    3. परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतलेजाणार नाही. (www.edivyasarthi.com)
बातमी शेअर करा !
Comments (0)
Add Comment