अदानी यांना मागे टाकत मुकेश अंबानी सर्वात श्रीमंत भारतीय

नवी दिल्ली ;- अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांना मागे टाकत रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी सर्वात श्रीमंत भारतीय बनले आहेत. मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या ‘३६० वन वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट २०२३’ मध्ये अंबानी ८.०८ लाख कोटी रुपयांच्या संपत्तीसह अव्वल स्थानावर आहेत.

आठवड्यातून ४ दिवस काम, ३ दिवस आराम; भारतातील ‘या’ कंपनीची ऑफर, फक्त १ अट ठेवली या यादीत गौतम अदानी दुसऱ्या स्थानावरआले आहेत, सध्या त्यांची संपत्ती ४.७४ लाख कोटी रुपये आहे. हिंडेनबर्ग संशोधन अहवालामुळे अदानींच्या एकूण संपत्तीत लक्षणीय घट झाली आहे. भारतातील सर्वात श्रीमंत लोकांची हुरुन भारताची ही १२ वी वार्षिक रँकिंग आहे.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक सायरस एस पूनावाला यांनी २.७८ लाख कोटी रुपयांच्या संपत्तीसह तिसरे स्थान कायम ठेवले आहे. एचसीएलचे शिव नाडर २.२८ लाख कोटींच्या संपत्तीसह चौथ्या स्थानावर आहेत आणि गोपीचंद हिंदुजा १.७६ लाख कोटींच्या संपत्तीसह पाचव्या स्थानावर आहेत.

सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीजचे संस्थापक आणि नेते दिलीप संघवी १.६४ लाख कोटींच्या संपत्तीसह सहाव्या स्थानावर राहिले. एलएन मित्तल, राधाकिशन दमानी, कुमार मंगलम बिर्ला आणि नीरज बजाज यांचाही टॉप-10 यादीत समावेश आहे.

२० वर्षांचा कैवल्य सर्वात तरुण अब्जाधीश आहे
या यादीत एकूण २५९ अब्जाधीश आहेत. त्यांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत ३८ अधिक आहे. झेप्टोचे संस्थापक कैवल्य वोहरा (२०) या यादीतील सर्वात तरुण अब्जाधीश आहेत. हुरुन लिस्ट लाँच झाल्यानंतर प्रथमच या यादीत समाविष्ट असलेल्या श्रीमंतांची एकत्रित संपत्ती १०९ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. हे सिंगापूर, यूएई आणि सौदी अरेबियाच्या एकत्रित जीडीपीपेक्षा जास्त आहे.

बातमी शेअर करा !
Adani Group chairman Gautam AdaniReliance Industries Chairman Mukesh Ambani
Comments (0)
Add Comment