भुसावळ येथे युवकाची गोळ्या झाडून हत्या !

भुसावळ (प्रतिनिधी ) ;-भुसावळ येथे आज सकाळी साडे सात वाजेच्या सुमारास एका तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची घटना उघडकीस आली असून खून करणाऱ्या चौघांचा पोलीस शोध घेत आहे . तेहरीन नासीर शेख (27, मचछीवाडा, जाम मोहल्ला, भुसावळ) असे मयत तरुणाचे नाव आहे.

तेहरीन नासीर शेख हा चहा पिण्यासाठी जाम मोहल्ला भागातील आर.के.किताब घरासमोरील डीडी सुपर कोल्ड्रिंक्स आणि चहाच्या दुकानात शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता आल्यानंतर दोन दुचाकीवर तोंडाला रूमाल बांधून आलेल्या चार संशयीतांपैकी तिघांनी आपल्याकडील गावठी पिस्तुलातून पाच गोळ्या झाडल्या. या घटनेने दुकानातील ग्राहकांमध्ये पळापळ झाली तर काही क्षणात संशयीत दुचाकीवरून पसार झाले.

शरीरातील विविध भागात गोळ्या लागल्याने तेहरीनचा जागीच मृत्यू झाला तर पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, पोलीस निरीक्षक राहुल वाघ व सहकार्‍यांनी धाव घेतली. चार संशयीतांचा कसून शोध सुरू आहे

बातमी शेअर करा !
bhusawalCrimemurder
Comments (0)
Add Comment