“द.. दप्तराचा द..” या लघु चित्रपटास सर्वोत्कृष्ट मायबोली प्रथम पुरस्कार जाहीर

जामनेर : दि. ११ व १२ फेब्रुवारी रोजी संपन्न झालेल्या देवगिरी फिल्म महोत्सवात जामनेर येथील तरुण दिग्दर्शक व चित्रपट कलावंत पराग चौधरी यांच्या” द दप्तराचा द ” या लघु चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मायबोली प्रथम पुरस्कार मिळाला आहे.
तसेच याच चित्रपटात बालकलाकाराची भूमिका करणारी कुमारी यादवी चौधरी हिला सुद्धा सर्वोत्कृष्ट बाल कलाकार म्हणून प्रथम पुरस्कार मिळाला आहे .
हा कार्यक्रम नुकताच जळगाव मध्ये झाला.
पंधरा दिवसापूर्वी “द दप्तराचा द” या लघु चित्रपटाचा प्रीमियर शो जामनेर येथील प्रसिद्ध शालिमार थेटर मध्ये प्रदर्शित झाला होता.
पराग चौधरी हा येथील तरुण चित्रपट कलावंत असून त्याचा अभिनय असलेला “एक नंबरचा ढ ” हा मराठी चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे.
‘द दप्तराचा द’ या मराठी लघु चित्रपटाला एकाच वेळी दोन पुरस्कार प्राप्त झाल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून पराग चौधरीं चे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.
समस्त तेली समाजा तर्फे आणि जामनेर कर यांच्याकडून पराग चौधरी चे खूप खूप अभिनंदन केले जात आहे. आणि त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा मिळत आहे.

बातमी शेअर करा !
Comments (0)
Add Comment