‘एनआय’ची महाराष्ट्रात मोठी कारवाई; पाकिस्तानशी संगमनत असणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या

मुंबई – राज्यात विधानसभा निवडणूक पार पडली आहे. महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. त्यानंतर आता राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयए (NIA) ने राज्यात अनेक ठिकाणी अचानक छापेमारी केली आहे. राज्यातील भिवंडी, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयएने छापेमारी केली आहे. एनआयने या ठिकाणी छापेमारी केली असून, एका तरुणाला ताब्यात घेतले आहे.
एनआयने भिवंडी, अमरावती येथे छापा टाकला आहे. या ठिकाणी तपास यंत्रणेने एकाला अटक केली आहे. भिवंडी आणि अमरावती येथून ताब्यात घेतलेले तरुण हे पाकिस्तानच्या संपर्कत असल्याची माहिती समोर येत आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणांची कसून चौकशी केली जात आहे. एनआयएने भिवंडीमध्ये या वर्षभरात तिसऱ्यांदा छापेमारी केल्याचे म्हटले जात आहे.
एनआयच्या टीमने काल रात्री अमरावती येथील छाया नगर येथे पोहोचून 35 वर्षीय तरुणाला अटक केल्याचे समोर आले आहे. त्या तरुणाला अटक केल्यानंतर एनआयने त्याला पोलीस ठाण्यात नेले. त्या परिसरातील पोलीस ठाण्यात त्या युवकाची चौकशी सुरू आहे. हा तरुण पाकिस्तानमधील एका संघटनेच्या संपर्कात असल्याचा संशय एनआयएला आहे. अधिक माहिती तपासात उघड होण्याची शक्यता आहे.
अमरावती येथील एक तरुण पाकिस्तानी संघटनेच्या संपर्कात असल्याची माहिती एनआयएला मिळाली होती. त्यानंतर एनआयएने छापेमारी करत या तरुणाला अटक केली आहे, तो तरुण पाकिस्तानी संघटनेच्या संपर्कात कशाप्रकारे आला? त्याचे पुढील नियोजन याबद्दल कसून तपास सुरू करण्यात आला आहे. एनआयने भिवंडी येथिण देखील एका तरुणाला ताब्यात घेलत्याचे समोर येत आहे.

जम्मू-कश्मीरसह पाच राज्यांमध्ये 22 ठिकाणी छापेमारी
राष्ट्रीय तपास संस्थेने जम्मू-कश्मीरमध्ये (NIA) मोठी कारवाई केल्याची बातमी समोर येत आहे. एनआयएने जम्मू-काश्मीरसह 5 राज्यांमध्ये 22 ठिकाणी कारवाई केल्याची माहिती आहे. जम्मू-कश्मीरमध्ये जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या दहशतवादी कारवाया सुरू असल्याची माहिती एजन्सीला मिळाली होती, या माहितीवरून एजन्सीने कारवाई केली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला येथील संगरी कॉलनीतील एका घरावर छापा टाकला. याशिवाय एनआयएने दहशतवादी कारवायांचा सुगावा लागल्याने जम्मू-काश्मीर व्यतिरिक्त महाराष्ट्र, यूपी, आसाम आणि दिल्लीसह पाच राज्यांमध्ये 22 ठिकाणांचा शोध घेतला आहे. यापूर्वीही अनेक दहशतवादी प्रकरणांमध्ये एनआयएने कारवाई केल्याचे सांगितले जात आहे. ज्याचे वर्णन दहशतवादाविरुद्धचे मोठे पाऊल आहे. एनआयए आणि एटीएसने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी छापे टाकले, त्यादरम्यान महाराष्ट्रातील छत्रपती संभाजी नगर, जालना आणि मालेगाव येथे छापे टाकण्यात आले. यावेळी पथकाने जालना येथून 2, छत्रपती शंभाजी नगर येथून 1 आणि मालेगाव येथून 1 जणांना ताब्यात घेतले आहे. एनआयए आणि एटीएसची दहशतवाद्यांच्या निधीबाबतची ही सर्वात मोठी कारवाई असल्याची माहिती याआधीच मिळाली होती.

बातमी शेअर करा !
Comments (0)
Add Comment