शेतकरी कुटुंबातील नूतन मराठा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याने बनवला ड्रोन
छोटेखानी फवारणी यंत्र बसवून पिकावर करता येईल फवारणी
जळगाव प्रतिनिधी
नूतन मराठा महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त नूतन गोल्डन सायन्स बॉईज या उपक्रमात अंतर्गत राष्ट्रीय विज्ञान दिनी एका सामान्य शेतकरी कुटुंबातील राज भोई या विद्यार्थ्याने यूट्यूब व गुगलवर सर्च करून ड्रोन बनवला .
हा ड्रोन का बनवला असं राज भोई या विद्यार्थ्याला विचारले असता त्याने सांगितले की, शेतात फवारणी करण्यासाठी मजूर मिळत नव्हते व फवारणी करताना वापरला जाणाऱ्या त्या औषधांचा मानवी आरोग्यावर परिणाम होत असतो . त्या अनुषंगाने त्याच्यावर छोटेखानी फवारणी यंत्र बसवून पिकावर फवारणी करता येईल हा त्याचा ड्रोन बनवणारा मागचा उद्देश होता.
त्याने निमित्ताने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल .पी .देशमुख यांनी राज भोई या विद्यार्थ्यांचा सत्कार केला . भविष्यात ड्रोन मॉडी फाय करण्यासाठी जो पण खर्च येईल तर महाविद्यालयातर्फे करण्यात येईल असे सांगितले .
हा ड्रोन बनवण्यासाठी सायन्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रा.आर. बी. देशमुख यांचे त्याला मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.माधुरी पाटील, डॉ.के. बी. पाटील, तसेच ज्युनिअर विभागाचे उपप्राचार्य प्रा. संजय पाटील , जूनियर व सीनियर विभागातील सर्व प्राध्यापक व प्राध्यापिका यांच्यासह सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी यांनी त्यांचे अभिनंदन केले.