चाळीसगावात रविवारी महिला व पुरुषांसाठी कुस्ती स्पर्धांचे आयोजन

जळगाव | प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी, भाजपा युवा मोर्चा व आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या संकल्पनेतून ‘नमो चषक 2024’ अंतर्गत चाळीसगाव शहरात रविवारी (ता. 21 जानेवारी) दुपारी 5 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक (सिग्नल पॉईंट) मैदानावर महिला व पुरूष गटासाठी कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
पुरूषांची 40, 45, 50, 57, 65, 74, 86, 91, 97 किलो वजनी गटात कुस्ती स्पर्धा होणार आहे, तर महिलांची 36, 41, 46, 50, 53, 57, 62, 68 किलो वजनी गटात स्पर्धा होणार आहे. दोन्ही गटातील कुस्ती स्पर्धा महाराष्ट्र राज्य कुस्ती संघटनेच्या नियमानुसार होतील. कुस्ती स्पर्धा मॅटवर खेळल्या जाणार असून, त्यासाठी विशिष्ठ गणवेश आवश्यक केला आहे. प्रत्येक कुस्तीला रोख स्वरूपात बक्षीस असेल आणि विजेता व उपविजेता कुस्तीगिराला योग्य ते बक्षीस दिले जाईल. स्पर्धेच्या ठिकाणी दुपारी तीन वाजेपासून स्पर्धकांची वजने मोजली जातील. स्पर्धेच्या दिवशी कोणत्याच स्पर्धकाला प्रवेश मिळणार नाही. प्रत्येक सहभागी स्पर्धकाला आकर्षक सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

बातमी शेअर करा !
Comments (0)
Add Comment