मराठा प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

जळगाव  | प्रतिनिधी

मराठा स्पोर्ट फाउंडेशन जळगाव संचलित मराठा प्रीमियर लीग गेल्या 5 वर्षापासून क्रिकेट लीगचे यशस्वीरित्या आयोजन करीत असून यंदाच्या सहाव्या पर्वात पदार्पण करीत आहे. यंदाही क्रिकेट प्रतियोगीता दिनांक 26 जानेवारी ते 5 फेब्रुवारी पर्यंत सागर पार्क, जळगाव येथे आयोजित करण्यात आलेली आहे. या स्पर्धेमध्ये एकूण 36 पुरुषांचे व 6 महिलांचे असे एकूण 42 संघ सहभागी होऊन खेळणार आहेत. या स्पर्धेचे 11 दिवसाचे नियोजन करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेला प्रमोद नाना पाटील, मनोज पाटील, बाळासाहेब सूर्यवंशी, कुलभूषण पाटील, राहुल पवार व मराठा प्रीमियर लीग सदस्य उपस्थित होते.

सदर मराठा प्रीमियर लीगला खा. उमेश पाटील आ. चिमणराव पाटील, आ. चंद्रकांत पाटील, आ. मंगेश चव्हाण, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, आ. अनिल पाटील, उपमहापौर कुलभूषण पाटील, शैलजा निकम, भैयासाहेब रवींद्र पाटील, दीपक सूर्यवंशी, डी डी बच्छाव, श्रीराम पाटील, प्रमोद पाटील, बाळासाहेब सूर्यवंशी, मनोज पाटील, प्रतिभा शिंदे, रंगकर्मी शंभू पाटील, लीना पवार, जितेंद्र देशमुख आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान मराठा प्रीमियर लीगच्या वतीने यावर्षी मराठा समाज डायरेक्टरी तयार करण्यात आली आहे. यात जळगाव जिल्ह्यातील मराठा समाजातील बंधू-भगिनींनी आपले नातेसंबंध जोपासण्यासाठी व संकरित होण्यासाठी आपला परिचय नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा !
#jalgaon#मराठा प्रीमियर लीग
Comments (0)
Add Comment