पाळधीनजीक लक्झरीला अपघात ; पालकमंत्री धावले अपघातग्रस्तासाठी !

जळगाव  | प्रतिनिधी 

धरणगाव रस्त्यावर पाळधी गावानजीक असलेल्या महामार्गावर हॉटेल सुगोकी जवळील रात्री 8 वाजेच्या सुमारास लक्झरी  पलटी होवून 30 ते 35 प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त आहे. यावेळील जिल्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील आपल्या पाळधी येथील निवासस्थानी जात असतांना त्यांना हा अपघात दिसून आला. यावेळी त्यांनी तत्काळ पलटी झालेल्या लक्झरीमधून जखमी प्रवाश्यांना बाहेर काढत मदतीचा हात देत रुग्णवाहिकेला बोलवून तत्काळ रुग्णालयात दाखल केले आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार शहरातून धरणगावकडे जाणाऱ्या महामार्गावर पाळधी गावानजीक असलेल्या सुगोकी हॉटेलजवळील महामार्गावर रात्री 8 वाजेच्या सुमारास 55 शिटर लक्झरी  खड्याच्या कारणाने पलटी झाली असता, पालकमंत्री गुलाबराव पाटील सुध्दा याच रस्त्याने वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला आपल्या निवासस्थानी जात असतांना त्यांना अपघातग्रस्त लक्झरी दिसून आल्याने त्यांनी आपल्या गाड्याचा ताफा थांबवित लक्झरीमधून जखमींना बाहेर काढून रुग्णवाहिकेला पाचारण करीत त्यांनी रुग्णालयात दाखल केले आहे. यावेळी प्रतापराव पाटील यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते मदतकार्य करीत आहे.

बातमी शेअर करा !
Comments (0)
Add Comment