250 बेशिस्त रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई

जळगाव : जळगाव येथे बेशिस्‍त रिक्षाचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. आतापर्यंत २५० हून अधिक रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली आहे यामध्ये शहर वाहतूक शाखा स्थानिक पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव शहरात रिक्षा चालकांवर धडक कारवाई केली आहे १ लाख ९२ हजार रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे. अशी माहिती सहाय्यक पोलीस अधिक्षक संदीप गावित यांनी दिली आहे.

जळगाव शहरातील वेगवेगळ्या भागांमध्य१८ डिसेंबर रोजी सकाळी जळगाव शहर वाहतूक शाखा आणि स्थानिक पोलिस यांच्या संयुक्त विद्यमानाने नियमांचे उल्लंघन करणारे तसेच सोबत बिल्ला न ठेवणे, रिक्षा चालवण्याची परमिट नसणे, विनापरवाना गॅस कीटवर वाहन चालवणे, पियूसी नसणे, इन्शुरन्स नसणे आणि जादा प्रवासी भरून वाहतूक करणे अशा रिक्षा चालकांवर धडक कारवाई करण्यात आलेली आहे. यामध्ये २५० रिक्षा जप्त करण्यात आलेल्या आहेत. तसेच ५ रिक्षचालकांविरुद्ध उद्या अवैध प्रवासी वाहतूक चा खटला न्यायालयात पाठवणार आहोत.

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनांवर ते शालेय विद्यार्थी असो परीक्षा चालक असो जे वाहन चुकीचे नियम मोडतील त्यांच्यावर अशीच कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सुरू राहील असे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी सांगितले.

बातमी शेअर करा !
Comments (0)
Add Comment