पी. जी. महाविद्यालयात ‘स्वामिनाथन व्याख्यानमाला

जळगाव ;- केसीई सोसायटीच्या पी. जी. महाविद्यालयात भारतीय हरित क्रांतीचे प्रणेते डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांच्या स्मरणार्थ पदव्यूत्तर विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. महाविद्यालयातील जैवतंत्रज्ञान विभागामार्फत आयोजित व्याख्यानमालेचे हे द्वितीय वर्ष आहे. यात प्रथम पुष्प गुंफताना मु. जे. महाविद्यालयाचे ग्रंथपाल तसेच माहिती स्रोत केंद्राचे संचालक डॉ. विजयश्रीनाथ कांची यांनी ‘ऑनलाईन सर्चिंग डेटाबेस आणि अद्ययावत सॉफ्टवेअरचा वापर’ या विषयावर व्याख्यान दिले. महाविद्यालायाचे प्राचार्य डॉ. विश्वनाथ झोपे यांचे प्रेरणेने आयोजित या कार्यक्रमात रसायनशाश्त्र विभागाचे प्रमुख डॉ. आर. एम. पाटील, ग्रंथपाल उल्हास पाटील आदी उपस्थित होते. जैवतंत्रध्यान विभागाचे प्रमुख डॉ. सारंग बारी यांच्या नेतृत्वात महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन केले.

बातमी शेअर करा !
KCE Society's P. G. The pioneer of Indian green revolution in the college Dr. M. S. Swaminathan
Comments (0)
Add Comment