पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जळगावात; ‘लखपती दीदीं’शी साधणार संवाद

जळगावः जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेच्या जिवत्रोती अभियानाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या ‘लखपती दिदी’ च्या मेळाव्यासाठी आग दि. २५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज जळगाव येथे वेणार आहे. हा मेळावा दुपारी १२.३० वाजता जळगाव विमानतळा जवळील प्राईम इंडस्ट्रीयल पार्क येथे होणार असुन मेळाव्यासाठी दिड लाख महिला येणार आहे. यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली असून भव्य वाटरप्रुफ डोम उभारण्यात आला आहे. मेळाव्याच्याच पूर्वसंध्येला केंद्रीय कृषी मंत्री शिवराज पाटील हे जळमावात दाखल झाले असून त्यांनी कार्यक्रमस्थळी भेट देवून व्यवस्थेचा आढावा घेतला आहे. या कार्यक्रमात देशभरातील १०० सखी मधून यप लखपती दिदीची निवड करण्यात आली असून त्यांना प्रातिनिधीक स्वरूपात प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येणार आहे. तसेच देशभरातील सहाय्यता गटांना २५०० कोटी झिरता निधीचे वाटप व ५ हजार कोटीचे बँक अर्थसहाय्य केले जाणार आहे. या मेळाव्यासाठी राज्यशासनासह जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे.

अन्य जिल्ह्यातील महिलांसाठी हॉटेलमध्ये व्यवस्था
लखपती दिदी मेळाव्यासाठी दिड लाख पेक्षा अधिक महिला येणार आहे. यांत अन्य जिल्ल्यासह अन्य राज्यातून आज महिला दाखल झाल्या असुन त्यांची व्यवस्था विविध हॉटेल मध्ये करण्यात आली आहे. या महिला आज मेळाव्यात दाखल होणार आहे. तसेच जिल्ह्यातील महिला या सकाळी ९ वाजेपर्यंत बुक करण्यात आलेल्या बसेस व्दारे कार्यक्रम स्थळी दाखल होणार आहे. यासाठी प्रशासनाकडून अधिकाऱ्यांनी नोडल अधिकारीची नियुक्ती केली आहे.

मोदीचा १०५ मिनीटांचा दौरा
लखपती दिदी मेळाव्यासाठी पंतप्रधानांचा १०५ मिनीटांचा दौरा निश्चित झाला असून सकाळी ११.१५ वाजता त्यांचे विषेश विमान जळगाव विमानतळावर दाखल होईल. त्यानंतर लखपती दिदीशी संवाद साधल्यानंतर ते दुपारी राजस्थानकडे रवाना होणार असल्याची माहीती मिळाली आहे.

केंद्र व राज्यातील मंत्र्यांची उपस्थिती
‘लखपती दिदी’चा मेळाव्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सकाळी ११ वाजता विमानतव्हावर दाखाल होणार असून १२ वाजता मेळाव्यास सुरुवात होणार आहे, या मेळाव्यासाठी केंद्रातील मंत्री, राज्यपाल, तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यासह जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, मंत्री गिरीष महाजन, अनिल पाटील आदी उपस्थित राहणार आहे.

३५००पोलिस अन् केंद्राचे सुरक्षा पथक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या लखपती दिदी या कार्यक्रमासाठी पोलिस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातून देखील मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त मागविण्यात आला असून सुमारे ३ हजार २०० पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा तगडा बंदोबस्त तैनात राहणार आहे. तसेच केंद्रातून देखील विषेश पथक तैनात करण्यात आले आहे.

२२ तासासाठी नो फ्लाईंग झोन
जळगावात आज पंतप्रधान येणार असल्याने दि.२४ रोजी ८ वाजेपासून तर २५ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत जळगाव विमानतळ परिघात ५० किमी पर्यंत नो फ्लाईंग झोन अर्थान उडड्डाणांना बंदी घालण्यात आली आहे. पंतप्रधान दौऱ्यासंबधीत महत्वाच्या विमानसेवा मात्र सुरू राहणार आहे.

बातमी शेअर करा !
Comments (0)
Add Comment