ठिकठिकाणी पुष्पहार घालून आ. राजूमामा भोळेंना जेष्ठांनी दिले शुभाशीर्वाद

महायुतीच्या रॅलीला प्रभात चौक, समर्थ कॉलनी, ओंकारेश्वर मंदिर, महाबळ परिसर येथे उत्तम प्रतिसाद

जळगाव : शहर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांना प्रचारात लोकप्रियता लाभत असून गुरुवारी दि. ७ रोजी दुपारी दुसऱ्या टप्प्यात प्रभात चौक, समर्थ कॉलनी, लक्ष्मी नगर, ओंकारेश्वर मंदिर, महाबळ परिसर येथे उत्तम प्रतिसाद मिळाला. आ. भोळे यांच्या प्रचार मार्गात अनेक गल्लींमध्ये नागरिकांनी आकर्षक रांगोळ्या काढून आ. राजूमामांचे पुष्पहार घालून जोरदार स्वागत केले. अनेक गल्ल्यांमध्ये जेष्ठ नागरिकांनी स्वतःहून पुष्पहार अर्पण करून विजयासाठी सदिच्छा दिल्या, या प्रेमाने आ. राजूमामा भोळे भारावले.

प्रभाग क्र. १२ मध्ये भाजप मंडळ क्रमांक ६ येथे गुरुवारी दि. ६ रोजी दुपारी महायुतीतर्फे प्रचार रॅली काढण्यात आली. नागरिकांनी मार्गावर सडा-समार्जन करून रांगोळ्या काढत आमदार राजूमामा भोळे यांचे सहर्ष स्वागत केले. लक्ष्मी नगर भागात पक्षाचे चिन्ह ‘कमळ’ फुलाचे मोठे चित्र काढून त्याखाली “फक्त राजूमामाच” असे लिहून फटाक्यांच्या आतिषबाजीत शुभेच्छा दिल्या. यावेळी नागरिकांनी आ. राजूमामा भोळे यांना उत्स्फूर्त पाठिंबा दिला. प्रभात चौकातील मारुती मंदिर येथे पूजा करून रॅलीला सुरुवात करण्यात आली.

तेथून एम.जे.कॉलेज गेट, समर्थ कॉलनी परिसर, ओंकारेश्वर मंदिर परिसर, सानिका कॉर्नर मार्गे गिरणा टाकी परिसर, पार्वती नगर, मायादेवी नगर परिसर, महाबळ कॉलनी परिसर मार्गे साईबाबा मंदिर येथे समारोप करण्यात आला. प्रचार मार्गात आ. भोळे यांनी ओमप्रकाश जाजू, माजी नगरसेविका गायत्री राणे, महानगर जिल्हाध्यक्ष उज्ज्वलाताई बेंडाळे, माजी आ. चंदूभाई पटेल, भागवतदादा भंगाळे, माजी नगरसेवक इंद्रजित पारख, माजी उपनगराध्यक्ष अशोक परदेशी आदी मान्यवरांच्या घरी भेटी दिल्या. तेथे महिला भगिनींनी औक्षण करीत विजयासाठी सदिच्छा दिल्या. ओंकारेश्वर मंदिर येथे आ. भोळे यांनी भगवान महादेवाचे दर्शन घेऊन पुजाऱ्यांचे आशीर्वाद घेत विजयासाठी साकडे घातले.

रॅलीमध्ये विधानसभा क्षेत्र प्रमुख विशाल त्रिपाठी, महानगर जिल्हाध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे, माजी आ. चंदूभाई पटेल, मंडळ क्रमांक ६ चे अध्यक्ष बापू कुमावत, माजी नगरसेवक गायत्री राणे, श्रीराम खटोड, सरिता नेरकर, अजित राणे, राहुल चौधरी, राजेंद्र खैरनार, विनोद भामरे, आशिष वाणी, नितीन इंगळे, जीवन अत्तरदे, ज्योती निंभोरे, निलाताई चौधरी, सविता बोरसे, सुवर्णाताई भंगाळे, वासंती चौधरी, मयूर भोळे, अमित भाटिया, शक्ती महाजन, मोहन बेंडाळे, रेखा पाटील, शिवसेना पक्षाचे नेते तथा माजी महापौर ललित कोल्हे, माजी नगरसेवक ॲड.दिलीप पोकळे, आशुतोष पाटील, स्वप्निल परदेशी, पियुष कोल्हे, रिपाई (आठवले) गटाचे जिल्हाध्यक्ष अनिल अडकमोल, प्रताप बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे विनोद देशमुख, लता मोरे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

बातमी शेअर करा !
Comments (0)
Add Comment