प्रभू श्रीराम मंदिर अयोध्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त जळगाव येथे भव्य राम कथेचे आयोजन

प्रभू श्रीराम मंदिर अयोध्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त जळगाव येथे भव्य राम कथेचे आयोजन” दि. २० ते २४ जानेवारी दरम्यान परमपूज्य श्री. दादा महाराज जोशी करणार कथा वाचन…

जळगाव | प्रतिनिधी

संपूर्ण जगाला व देशाला ज्या आनंद व मंगलमय क्षणाची आतुरता होती अश्या प्रभू श्रीराम मंदिर अयोध्या येथे दि. २२ जानेवारी २०२४ ला भव्य प्राण प्रतिष्ठा सोहळा संपण होणार असून याचे औचीत साधून राम मंदिर ते राष्ट्र मंदिर या प्रेरणेतून जळगाव शहरात सर्व श्रीराम भक्त, शिवमहापुराण समिती व राजूमामा भोळे मित्र परिवार यांच्या वतीने जळगाव शहरात भव्य श्रीराम रामकथेचे आयोजन दि. २० ते २४ जानेवारी २०२४ दरम्यान जी.एस. शिवतिर्थ मैदान येथे दुपारी. ०१ ते सायंकाळी ०५ या वेळेत श्री. चिमुकले राम मंदिराचे परमपूज्य श्री. दादा महाराज जोशी यांच्या सुंदर वाणीतून श्रीराम कथेचे वाचन करण्यात येणार असून. या भव्य श्रीराम कथेप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री मा.ना. गिरीषभाऊ महाजन, खा. उन्मेष दादा पाटील, आ. सुरेश भोळे (राजूमामा), भा.ज.प जळगाव जिल्हा महानगर जिल्हाध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे हे मान्यवर उपस्थित राहणार असून तसेच जळगाव शहरातील सर्व राम भक्त बंधू, भगिनी, जेष्ठ नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित राहून प्रभू श्रीराम कथेचे लाभ घेऊन आपल्या जीवन सार्थक करावे असे आव्हान आयोजक सर्व श्रीराम भक्त, शिवमहापुराण समिती व राजूमामा भोळे मित्र परिवार यांनी केले आहे.

बातमी शेअर करा !
Comments (0)
Add Comment