सोन्याच्या किमतीत झपाट्याने वाढ; 2025 पर्यंत 10 ग्रॅमसाठी ₹1.3 लाखांचा टप्पा गाठणार?

नवी दिल्ली: वाढत्या जागतिक आर्थिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या किमतीत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय गुंतवणूक संस्था गोल्डमन सॅक्सच्या अंदाजानुसार, सध्या 3,247 डॉलर प्रति औंस (28.35 ग्रॅम) असलेले दर 2025 पर्यंत 4,500 डॉलर पर्यंत जाऊ शकतात. यामुळे भारतात 10 ग्रॅम सोन्याची किंमत सुमारे ₹1.3 लाखांपर्यंत पोहोचू शकते, असा तर्क वर्तवण्यात आला आहे.

गोल्डमन सॅक्सने हे भाकीत अमेरिका-चीन व्यापार तणाव, जागतिक मंदीची शक्यता आणि बाजारातील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर मांडले आहे. कंपनीने यापूर्वीही दोन वेळा दरवाढीचा अंदाज सुधारित केला होता, आणि आता तिसऱ्यांदा तो 4,500 डॉलर प्रति औंस पर्यंत नेला आहे. जर जागतिक परिस्थिती पूर्वपदावर राहिली, तरही सोन्याचे दर 3,700 डॉलर प्रति औंसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

सोन्यात गुंतवणुकीकडे वाढता कल: गेल्या आठवड्यात सोन्याच्या किमतीत 6.5% वाढ झाली असून, कोव्हिड-19 नंतरची ही सर्वाधिक साप्ताहिक वाढ मानली जात आहे. ट्रम्प यांच्या टॅरिफ घोषणांमुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे सोन्याच्या दरांना आधार मिळाला आहे.

मध्यवर्ती बँकांचीही वाढती मागणी: सध्याच्या आर्थिक अस्थिरतेच्या काळात गुंतवणूकदार, संस्था आणि मध्यवर्ती बँका सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे वळत आहेत. या वर्षीच्या पहिल्या तिमाहीत गोल्ड ईटीएफमध्ये 2020 नंतर सर्वाधिक गुंतवणूक झाली आहे. डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्यासाठीही सोने खरेदीला प्राधान्य दिलं जात आहे.

बातमी शेअर करा !
Comments (0)
Add Comment