नवी दिल्ली – एनडीटीव्ही इंडियाचे वरिष्ठ कार्यकारी संपादक रविश कुमार यांनी त्यांचा पदाचा राजीनामा दिला आहे. रविश कुमार यांचा राजीनामा कंपनीने स्वीकारल्यामुळे एनडीटीव्ही इंडियामधून बाहेर पडणार आहे. कंपनीने देखील रविश कुमार यांचा राजीनामा स्वीकारला असून तो तात्काळ प्रभावानं लागू होईल असं सांगितलं आहे.
रविश कुमार हे एनडीटीव्ही इंडिया (हिंदी) वृत्तवाहिनीच्या कार्यकारी संपादकपदाची धुरा सांभाळायचे. रविश कुमार हे अनेक दशकापासून एनडीटीव्ही इंडिया (हिंदी) वृत्तवाहिनीत कार्यरत होते. रविश कुमार यांनी वृत्तवाहिनीवर अनेक कार्यक्रमात सुत्रसंचालन केले.
या कार्यक्रमात हम लोग, रविश की रिपोर्ट, देश की बात आणि प्राइम टाइमचा सामावेश आहे. रविश कुमार यांना पत्रकारितेच्या योगदानासाठी रामनाथ गोयंका उत्कृष्टता पत्रकारिता पुरस्कार आणि २०१९ साली रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.