सकल मराठा वधू-वर परिचय मेळावा उत्साहात

मराठा तरुणांनी शेतीवर अवलंबून न राहता शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करावी : मा.आमदार स्मिता वाघ

जामनेर : प्रतिनिधी

 

मराठा समाजाचा पूर्वीपासून मुख्य व्यवसाय शेती होता. पन्नास शंभर एकर जमिनीचा मालक शेतकरी आता अल्पभूधारक झाला आहे त्यामुळे शेतकरी कुटुंबातील तरुणांनी निवड शेती व्यवसायावर अवलंबून न राहता शैक्षणिक क्षेत्रात प्रगती व शेतीला पूरक व्यवसाय विविध उद्योग धंदे करून प्रगती करावी असे माजी आमदार स्मिता वाघ यांनी केले.

जामनेर तालुका सकल मराठा समाजातर्फे विशाल लॉन्स येथे आयोजित समाज वधु वर मेळावा व मराठा समाज स्नेह मेळाव्यात त्या बोलत होत्या सकल मराठा समाजाचे कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी प्राध्यापक डी.डी बच्छाव सर हे होते. मेळाव्याच्या माध्यमातून समाजपयोगी व विधायक उपक्रम राबवण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्नशील रहा असे आवाहन सकल मराठा समाज तालुकाध्यक्ष दिलीप खोडपे यांनी यावेळी केले सामाजिक राजकीय शैक्षणिक व सर्व क्षेत्रात काम करताना एकत्र असणारा मराठा समाज मात्र लग्न करताना कुणबी लावतो हा भेद (डी.एम.के फॉर्मुला) मिटला पाहिजे. अशी खंत प्रतिभाताई शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली. इतिहासकार ललित पाटील ह-मुक्काम पुणे भीमराव मराठे, आनंद मराठे, प्राध्यापक डी.डी बच्छाव,आदींनी यावेळी मनोगत व्यक्त केले.

यावेळी सुभेदार तानाजी मालुसरे यांचे वंशज कुणाल मालुसरे,येसाजी कंक यांचे वंशज रवींद्र कंक,खोयाजी बांदल यांचे वंशज अक्षय बांदल, हंबीरराव मोहिते यांचे वंशज राजेंद्र मोहिते, बंटी गायकवाड यांचे वंश संतोष गायकवाड, दाजी जगताप यांचे वंशज मंथन जगताप, धारावी माता वंशज अमित गाडे, माजी आमदार कैलास पाटील, जामनेरच्या नगराध्यक्ष साधना महाजन, जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी, उद्योजक श्रीराम पाटील, वासुदेव पाटील, सोमनाथ मराठे, गोपाल दर्जी, निलेश पाटील, राम पवार, शंकर मराठे,राहुल चव्हाण आदी विविध राजकीय, सामाजिक व सहकारी संस्थेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. समाधान मुळे एस.टी. चौधरी, भगवान शिंदे यांनी सूत्रसंचालन तर शंकर आप्पा मराठे यांनी आभार मानले.

 

बातमी शेअर करा !
#Jamner#वधू-वर परिचय मेळावा
Comments (0)
Add Comment