374 टनाच्या अखंड काळ्या पाषाणात उभारली सिद्धी गणपतीची 31 फूटाची मूर्ती

जळगाव : जळगावतल्या पाळधीमध्ये देशातील सर्वात मोठ्या महाकाय सिद्धी महागणपतीची स्थापना करण्यात आली आहे.  जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील पाळधी गावाबाहेर श्री सिध्दी महागणपती भव्य अस देवस्थान उभारण्यात येत आहे. श्री सिध्दी वेंकटेश देवस्थानाच्या वतीने विश्वस्त श्रीकांत मणियार यांच्या वतीने हे भव्य असं मंदीर साकारण्यात येत असून याठिकाणी देशात कुठेही नाही. एवढ्या उंच तब्बल 31 फूट उंचीची श्री गणेशाची मूर्ती या मूर्तीची आज प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे.

 

374 टनाच्या एकाच अखंड काळ्या पाषाणात ही मूर्ती तयार करण्यात आली आहे. दक्षिण भारतात ज्या ठिकाणी दगड मिळाला त्याचठिकाणी मूर्तीकारांनी ती तयार केली असून तिला पूर्ण होण्यास दोन वर्षांचा काळ लागला. 100 टन एवढे या मूर्तीचे वजन आहे तसेच या मूर्तीच्या आजूबाजूला 15 फूट उंचीच्या रिद्धी आणि सिद्धी मूर्ती सुध्दा आहेत. आजूबाजूला रिध्दी सिध्दी असलेले आणि तर श्री गणरायाच्या सोंडेत अमृत कुंभ, पोटावर नाग, आणि कपाळावर घंटा अशी मूर्ती असलेले गणरायांचे हे देशातलं एकमेव मंदिर असल्याचं विश्वस्त सांगतात. तब्बल 200 किलोची घंटा सुध्दा याठिकाणी असून ही विशालकाय मूर्ती आणण्यासाठी क्रेन सुध्दा मुंबई येथून मागविण्यात आली. आधी मूर्ती ठेवण्यात आली, त्यानंतर आता मंदीर साकारण्यात येत आहे.

 

काय आहे वैशिष्ट्यं? 

जिल्हाभरातच्या चार ते पाच हजार भाविकांनी लिहलेली ओम गण गणपतेय नम: अशी मंत्र असलेली तब्बल 21 कोटी एवढी मंत्र लिहलेली पुस्तक या मूर्तीखाली ठेवण्यात आली आहे. एका पुस्तकात 54 हजार नावे होती. एक पान लिहायला तब्बल 40 मिनिटे लागायची. अशा पध्दतीने 21 कोटी मंत्र लिहायला अडीच वर्ष लागली. मूर्तीच्या खाली 21 ते 22 फूट खोल पाच थरामध्ये पॅकिंग करुन ठेवण्यात आलेली आहेत. त्यानंतर त्यावर मूर्ती ठेवण्यात येवून मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे.

शेकडो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या भक्तीभावाने या सिध्दी महागणपतीच्या प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी राजस्थान, काशी अशा वेगवेगळ्या राज्यांमधील 18 विद्वानांना बोलाविण्यात आलं आहे. त्याच्या हस्ते नान्दीश्राद्ध, गणपती मातृका पूजन, दशविध स्नान हवन, नित्य आराधना, जलयात्रा व अभिषेक असे करण्यात येवून प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. सध्या या मुर्तीला देवस्थ भेट देत आहेत.

बातमी शेअर करा !
Comments (0)
Add Comment